Entertainment News : अभिनेत्री सुरुची अडारकर आणि पियुष रानडे यांच्या घरी चिमुकलीचे आगमन

Suruchi Adarkar and Piyush Ranade become parents: मराठी मनोरंजन विश्वातील लाडकी जोडी अभिनेत्री सुरुची अडारकर आणि अभिनेता पियुष रानडे यांच्या घरात सध्या आनंदाचे वातावरण आहे. सुरुची आणि पियुषच्या आयुष्यात एका नव्या छोट्या पाहुण्याचे आगमन झाले आहे.
SURUCHI ADARKAR AND PIYUSH RANDE
SURUCHI ADARKAR AND PIYUSH RANDE SAAM TV
Published On: 

लोकप्रिय अभिनेत्री सुरुची अडारकरने स्वतः सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर करत आपल्या चाहत्यांना ही गोड बातमी दिली आहे. तिच्या या पोस्टनंतर चाहत्यांसह संपूर्ण कलाविश्वातून या जोडप्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

SURUCHI ADARKAR AND PIYUSH RANDE
Drishyam 3 OTT : थिएटरनंतर ओटीटीवर रंगणार 'दृश्यम ३'चा थरार, अजय देवगनचा चित्रपट कधी अन् कुठे पाहता येणार?

सुरुचीने सोशल मीडिया अकाउंटवरून एक सुंदर फोटो शेअर करत ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली. तिने या पोस्टसोबत लिहिले की, आपल्या आयुष्यात एका नव्या पर्वाला सुरुवात झाली आहे.

SURUCHI ADARKAR AND PIYUSH RANDE
Bigg Boss 20 : सलमान खानने सदस्यांना दिला मोठा धक्का, बिग बॉसच्या घरात पहिल्या वाईल्ड कार्ड स्पर्धकाची धमाकेदार एन्ट्री

सुरुची अडारकर आणि पियुष रानडे यांनी काही महिन्यांपूर्वीच अत्यंत साधेपणाने लग्नगाठ बांधली होती. त्यांच्या लग्नाचे फोटो समोर आल्यानंतर चाहत्यांना मोठा आनंददायी धक्का बसला होता. तेव्हापासूनच ही जोडी मराठी प्रेक्षकांची अत्यंत लाडकी जोडी बनली आहे. आता त्यांच्या घरात छोट्या बाळाचे आगमन झाल्याने या जोडप्याचा आनंद द्विगुणित झाला आहे.

सुरुची आणि पियुष दोघांनीही मराठी टेलिव्हिजन आणि चित्रपटसृष्टीत आपल्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. सुरुचीच्या या आनंदाच्या पोस्टवर प्रार्थना बेहरे, अमृता खानविलकर, सायली संजीव यांसारख्या अनेक दिग्गज कलाकारांनी कमेंट करत नवजात बाळाला आशीर्वाद दिले आहेत . चाहत्यांनीही कमेंट्सच्या माध्यमातून या नव्या प्रवासासाठी सुरुची आणि पियुषला खूप खूप प्रेम आणि शुभेच्छा दिल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com