Diwali Holidays : दिवाळीच्या सुट्टीत मुलांना कसं ठेवाल व्यस्त? जाणून घ्या ६ भन्नाट उपाय

Alisha Khedekar

मुलांचे छंद जोपासा

मुलांच्या शाळेला यंदाच्या दिवाळीत मोठी सुट्टी असेल तर त्यांचे छंद जोपासण्यावर भर द्या. यामध्ये त्यांना चित्रकला शिकवा, संगीत, नृत्य यासारख्या विविध कलेंमध्ये व्यस्त ठेवा.

Best Diwali holiday activities | Google

गोष्टींची पुस्तके

मुलांच्या वयानुसार मनोरंजक पुस्तके निवडा. दररोज एक गोष्ट वाचण्याची सवय लावा आणि त्यांना स्वतःच्या शब्दांत गोष्ट सांगायला सांगा.

Reading Books Spent Time Vaccation | Google

आकाशकंदील बनवा

रंगीत कागद, सजावटीचे साहित्य वापरून मुलांना आकाशकंदील बनवायला शिकवा. यामुळे त्यांची कल्पनाशक्ती आणि सर्जनशीलता वाढण्यास मदत होईल.

Creative Diwali craft ideas | Google

स्वयंपाकात मदत

मुलांना लाडू व चिवड्याच्या तयारीत सहभागी करा. सुरक्षित कामे त्यांच्याकडून करून घ्या आणि स्वच्छतेचे महत्त्वही समजावून सांगा.

Simple cooking activities for children | Google

खेळ खेळू द्या

जिगसॉ पझल्स, शब्दकोडी, बुद्धिबळ, स्मरणशक्तीचे खेळ, सायकलिंग, बॅडमिंटन, क्रिकेट किंवा पकडापकडीसारखे खेळ खेळू द्या.

Indoor and outdoor games for children | Google

कुटुंबासोबत वेळ

मुलांसोबत कॅरम, अंताक्षरी किंवा बोर्ड गेम्स खेळा. एकत्र गप्पा मारा आणि दिवाळीच्या आठवणी तयार करा, ज्यामुळे नातेसंबंध अधिक घट्ट होतील.

Best family bonding activities | Google

टीप

सदर माहिती सामान्य ज्ञानावर असून योग्य माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा

Diwali vacation ideas | Google

NEXT : चहा रोज प्यायला आवडत असेल तर, 'या' ६ चुका अजिबात करू नका; नाहीतर वाढेल कॅन्सरचा धोका

Tea Drinking Habits Tips | Google
येथे क्लिक करा