गेल्या काही महिन्यांपासून अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कारवाईचा धडाका लावला आहे. भेसळखोरांविरोधात सुरू असलेल्या त्यांच्या धडक कारवायांमुळे अन्न व औषध प्रशासन हा विभाग सर्वसामान्यांच्या चर्चेचा विषय ठरला आहे. मुंढे यांच्या कारवाईमुळे भेसळमाफियांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत. दरम्यान, तुकाराम मुंढे यांनी साम टीव्हीच्या 'ब्लॅक अँड व्हाईट' या विशेष कार्यक्रमाला मुलाखत दिली. या मुलाखतीदरम्यान त्यांना त्यांच्या बदलीनंतर अन्न व औषध प्रशासन विभागाचे काय होणार, असा महत्त्वाचा प्रश्न विचारण्यात आला. तुकाराम मुंढेंची बदली झाली, तर FDA चं सुरू असलेलं मिशन थांबणार का? असा सवाल त्यांना करण्यात आला. यावर मुंढे यांनी नेमकं काय उत्तर दिलं? त्यांच्या बदलीनंतरही भेसळखोरांविरोधातील कारवाई सुरू राहणार का? याबाबत त्यांनी काय भूमिका मांडली, पाहा व्हिडिओ.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.