संदीप चव्हाण
Anti-Marathi Protest In Mumbai viral video : आम्ही मराठी बोलणार नाही...यासाठी मुंबईत आंदोलन करण्यात आलंय...होय, मुंबईत आंदोलन केल्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय...पण, खरंच मुंबईत मराठीविरोधात आंदोलन झालंय का...? हा व्हिडिओ पाहून संताप व्यक्त केला जातोय...त्यामुळे आम्ही या व्हिडिओची पडताळणी केली...त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात...
हा व्हिडिओ पाहून तुमच्या तळपायाची आग मस्तकात गेल्याशिवाय राहणार नाही...कारण, मुंबईतच राहून परप्रांतिय मराठी भाषेविरोधात आंदोलन करतायत...आम्ही मराठी बोलणार नाही, असे बॅनर हातात घेऊन आंदोलन केल्याचा दावा करण्यात आलाय...मुंबईत राहून हे मुंबईविरोधात आंदोलन करूच कसे शकतात...असे सवाल आता उपस्थित केले जातायत...
मुंबईतील ताज हॉटेल आणि गेट वे ऑफ इंडियासमोर उभं राहून हे मराठी विरोधात आंदोलन केल्याचं दिसतंय...यांच्या हातात 'आम्ही मराठी बोलणार नाही' असे बॅनर्स दिसतायत...हा व्हिडिओ पाहून मराठी माणसांमध्ये संतापाची लाट पसरलीय...काहींनी तर हे आंदोलन कुणी केलं याचा शोध घेतायत...तर काहींनी यांना थेट धमकीवजा इशारा दिलाय...मात्र, खरंच हे आंदोलन झालंय का...? आंदोलन करणारे नक्की कोण होते...? याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे...कारण, यामुळे मराठी-परप्रांतिय असा वाद निर्माण होऊ शकतो...त्यामुळे आमच्या टीमने या व्हिडिओ पडताळणी सुरू केली...त्यावेळी आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहुयात...
व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?
मराठी भाषेविरोधात मुंबईत आंदोलन झालेलं नाही
ताज हॉटेल बाहेरील आंदोलनाचा व्हिडिओ खोटा
व्हायरल व्हिडीओ AI टेक्नोलॉजीनं तयार केलाय
AI टेक्नोलॉजीचा गैरवापर करून दिशाभूल
मराठी भाषेच्या जनजागृतीसाठी व्हिडिओ बनवला
हा व्हिडिओ एआय टेक्नोलॉजीचा वापर करून बनवलाय...मात्र, हा व्हिडिओ वेगानं व्हायरल होत असून, यामुळे संताप व्यक्त केला जातोय...आमच्या पडताळणीत मराठीविरोधात मुंबईत आंदोलन झाल्याचा दावा असत्य ठरलाय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.