फ्रान्सच्या महिलेवर बलात्कार प्रकरणी पुष्पराजला बेड्या, बॉलिवूड कनेक्शन निघाले, सलमान-अक्षयसोबत केलेय काम

French tourist rape case Udaipur Bollywood connection : उदयपूरमध्ये फ्रान्सच्या महिलेवर बलात्कार; आरोपी सिद्धार्थ ओझा उर्फ पुष्पराज अटकेत. बॉलिवूड कनेक्शन उघड, सलमान-अक्षयसोबत केले होते काम. परदेशी महिलेवरील अत्याचारामुळे देशभरात खळबळ; पोलिस तपास वेगाने सुरू.
Udaipur rape case update police action
Accused Pushparaj, who worked with Bollywood celebrities, arrested for raping a French tourist in Udaipur. He was nabbed from Chittorgarh after fleeing the scene.google
Published On

casting director accused of raping foreign woman : उदयपूरमध्ये फ्रान्सच्या पर्यटक महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी एका व्यक्तीला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. उदयपूर पोलिसांनी या प्रकरणातील मुख्य आरोपी सिद्धार्थ ओझा उर्फ पुष्पराज याला चित्तौडगड येथून अटक केली आहे. २२ जून रोजी उदयपूरमध्ये एका ३० वर्षीय फ्रान्सच्या पर्यटक महिलेवर बलात्काराची धक्कादायक घटना घडली. फ्रान्सच्या महिलेवर बलात्कार केल्याची घटना समोर आल्यानंतर संपूर्ण देशात खळबळ उडाली. आरोपीचे बॉलिवूड कनेक्शन समोर आले आहे. आरोपीने सलमान खान आणि अक्षय कुमार यासारख्या स्टारसोबत काम केलेय.

Udaipur rape case update police action
तुमचा मोबाइल नंबर किती जुना? ५ वर्ष एकच नंबर सांगतो तुझ्याबद्दल ५ गोष्टी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फ्रानसची पीडित महिला दिल्लीहून २२ जून रोजी उदयपूरला एका शूटसाठी आली होती. अंबामाता येथील एका हॉटेलमध्ये ती मुक्कामी होती. आरोपी पुष्पाच्या ‘उदयपूर कास्टिंग कॉल’ या कंपनीने शूटिंगचे आयोजन केले होते. २२ जूनच्या रात्री पीडित महिला आणि इतर काही सहकारी टायगर हिल्स परिसरातील ‘ग्रीक फार्म’ या रेस्टॉरंटमध्ये जेवणासाठी गेले होते. त्यावेळी आरोपी सिद्धार्थने तिच्याशी ओळख वाढवली आणि सिगारेट पिण्याच्या बहाण्याने तिला आपल्या सुखेर येथील फ्लॅटवर नेले. तिथे त्याने तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केल्याचा आरोप आहे. घटनेनंतर आरोपीने पीडितेला तिच्या हॉटेलवर सोडले आणि तो फरार झाला होता.

Udaipur rape case update police action
रेल्वेचे तिकीट दर वाढले, १ जुलैपासून प्रवास महागणार, कशी असेल नवी भाडेवाढ?

आरोपीला बेड्या ठोकल्या -

या घटनेनंतर पीडित महिलेने खासगी रुग्णालयात दाखल होऊन उपचार घेतले. त्यानंतर आपल्यासोबत घडलेला प्रसंगाबाबत तिने पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली. बडगांव पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ६४(१) (बलात्कार) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीने पीडितेला फसवून आपल्या घरी नेले आणि अत्याचार केले. आम्ही आरोपीला चित्तौडगड येथील त्याच्या घरी अटक केली. पीडितेची वैद्यकीय तपासणी पूर्ण झाली असून, ती सध्या स्थिर आहे. फ्रेंच दूतावासाला या घटनेची माहिती देण्यात आली आहे, अशी माहिती उदयपूरचे पोलीस अधीक्षक योगेश गोयल यांनी दिली.

Udaipur rape case update police action
Pune : जुन्नरमध्ये खळबळ! १२०० फूट खोल दरीत मृतदेह आढळले, तलाठी अन् कॉलेज तरुणीचा समावेश

आरोपीचे बॉलिवूड कनेक्शन -

आरोपी सिद्धार्थ आठ वर्षांपासून उदयपूरमध्ये राहतोय. सिद्धार्थ कास्टिंग डायरेक्टर म्हणून काम करतो. तो सलमान खान आणि अक्षय कुमार यांच्या चित्रपटांसह अनेक जाहिराती, म्युझिक व्हिडीओ आणि मालिकांसाठी कास्टिंग करत होता.

पोलिसांनी बेड्या ठोकल्यानंतर सिद्धार्थने आपण निर्दोष असल्याचे सांगितले. मला हवी ट्रॅपमध्ये अडकवण्यात आल्याचा दावा त्याने केला आहे. दरम्यान, हा गुन्हा संवेदनशील असल्याने आणि परदेशी महिला नागरिक यात सामील असल्याने, या प्रकरणाचा तपास वेगाने केला जात आहे.

Udaipur rape case update police action
Pune : महिला पोलिस अधिकाऱ्याशी गैरवर्तन, पुण्यात भाजप पदाधिकाऱ्यावर गुन्हा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com