अक्षय बडवे, साम टीव्ही
Pune Water Supply Latest News: गेल्या महिन्याभरापासून राज्यात पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे बळीराजा संकटात सापडला असून पाण्याअभावी पिके करपून चालली आहे. ग्रामीण भागासह शहरात देखील अद्याप समाधानकारक पाऊस नाही नाही. त्यामुळे पाणीटंचाईचं संकट उभं राहिलं आहे. पुणे, मुंबई आणि नाशिक जिल्ह्यातील अनेक धरणं अद्यापही पूर्ण क्षमतेने भरलेली नाही. (Latest Marathi News)
पहिल्याच पावसात पुण्यातील (Pune News) खडकवासला, पानशेत आणि मुळा-मुठा धरणात समाधानकारक पाणीसाठा जमा झाला होता. मात्र, आता पावसाने महिनाभरापासून दडी मारल्याने धरणातील पाणी झपाट्याने कमी होत आहे. हीच बाब लक्षात घेता, पुण्यात पुन्हा एकदा पाणीकपात लागू होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे.
उद्या म्हणजेच शनिवारी पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी तातडीने बैठक बोलावली आहे. या बैठकीत पाणीकपातीचा निर्णय होण्याची शक्यता आहे. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार की नाही, याबद्दल अजून स्पष्टता आलेली नाही.
पुणे शहर व परिसराला पाणीपुरवठा (Pune Water Supply) करणाऱ्या खडकवासला, पानशेत आणि मुळा-मुठा या धरणांमध्ये सध्या २७.६० अब्ज घनफूट इतका पाणीसाठा आहे. मात्र, पावसाने पाठ फिरवल्याने हा पाणीसाठी झपाट्याने कमी होत आहे. त्यामुळे पावसाळा संपेपर्यंत पाण्याचं नियोजन कसं करायचं?, यावरही सखोल चर्चा केली जाणार आहे.
पुणे शहराला दरवर्षी १८.५ टीएमसी इतक्या पाणीसाठ्याची आवश्यकता असते. यंदा पावसाने दडी मारल्याने पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पाण्याची चांगली आवक झालेली नाही. त्यामुळं पुणेकरांना कमीत कमी पाण्यात गरज भागवावी लागणार आहे. दरम्यान, पुण्यात पुन्हा एकदा दर गुरुवारी पाणीपुरवठा कपात होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Edited by - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.