Pune School News: विद्येच्या माहेरघरात शिक्षण विभागाची मोठी कारवाई; अनधिकृत शाळेचा पर्दाफाश

Pune School Action: विद्येचं माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात गुरूवारी (३१ ऑगस्ट) शिक्षण विभागाने मोठी कारवाई केली आहे.
Pune News Education department action against unauthorized schools in Kondhwa area ssd92
Pune News Education department action against unauthorized schools in Kondhwa area ssd92Saam TV
Published On

अक्षय बडवे, साम टीव्ही

Pune Unauthorized School Action: विद्येचं माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात गुरूवारी (३१ ऑगस्ट) शिक्षण विभागाने मोठी कारवाई केली आहे. कोंढावा परिसरात सुरू असलेल्या अनधिकृत शाळेचा शिक्षण विभागाने पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी शाळेच्या संस्थाचालक मुख्याध्यापक यांच्यासह इतरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Latest Marathi News)

Pune News Education department action against unauthorized schools in Kondhwa area ssd92
Gas Cylinder Price: सप्टेंबरच्या पहिल्याच दिवशी गुड न्यूज; गॅस सिलिंडरच्या दरात १५७ रुपयांची घसरण, पाहा नवे दर

पुण्यातील कोंढावा (Pune News) परिसरातीत टीम्स तकवा इस्लामिक मतलब अँड स्कूल ही शाळा अनधिकृतरित्या चालवली जात असल्याची तक्रार शिक्षण विभागाकडे प्राप्त झाली होती. या शाळेच्या संस्था चालकांनी शिक्षण उपसंचालक यांची परवानगी न घेता, जिल्हा परिषदेचे शिक्षण अधिकारी यांची मान्यता न घेता शाळेत पहिली ते आठवीपर्यंतचे वर्ग चालू केले होते.

ऑगस्ट 2022 पासून सुरू असलेल्या शाळेत (School) एकूण 158 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आले होते. या शाळेला मान्यता नसल्यामुळे यु-डायस नंबर नव्हता. तसेच शाळेचा समावेश शासनाच्या सरल पोर्टलवर नसल्यामुळे विद्यार्थ्यांना सरल आयडी नव्हता.

Pune News Education department action against unauthorized schools in Kondhwa area ssd92
Panvel Missing Girl News: २० वर्षीय तरुणीच्या मृत्यूचं गुढ उलगडलं; पोलीस तपासात समोर आली धक्कादायक माहिती

त्यामुळे या शाळेत शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना दुसऱ्या शाळेत प्रवेश मिळण्यास अडचण निर्माण होत होती. याशिवाय विद्यार्थ्यांना शाळेकडून दिलेले शाळा सोडल्याचे दाखले आणि इतर दाखले वैध आणि नियमानुसार नव्हते. याबाबतची तक्रार प्राप्त होताच शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकत शाळेचा पर्दाफाश केला.

याप्रकरणी पुणे महापालिकेच्या शिक्षण विभागातील प्रशासकीय अधिकारी शंकर रामचंद्र मांडवे कोंढावा पोलिसात तक्रार दिली. तक्रार प्राप्त होताच टीम्स तकवा इस्लामिक मकतब अँड स्कूल शाळेचे संस्थाचालक उस्मान आत्तार, सचिव फिरोज खान यांच्यासह मुख्याध्यापक आणि इतरांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com