Today Winter Temprature : राज्यात तापमानात चढ-उतार! 'या' जिल्ह्यांत पारा १० अंशाच्या खाली; वाचा आजचे हवामान कसे असेल?

Maharashtra Weather Update News : राज्यात उत्तर वाऱ्यांचा वेग कमी झाला असला तरी थंडीचा गारठा कायम आहे. अनेक भागांत किमान तापमान १० अंशांच्या खाली नोंदले गेले असून हवामान विभागाने पुढील काही दिवस थंडी कायम राहण्याचा अंदाज वर्तवला आहे.
Today Winter Temprature : राज्यात तापमानात चढ-उतार! 'या' जिल्ह्यांत पारा १० अंशाच्या खाली; वाचा आजचे हवामान कसे असेल?
Maharashtra Weather UpdateSaam tv
Published On
Summary
  • राज्यातील अनेक भागांत तापमान 10 अंशांच्या खाली

  • पहाटे धुके आणि सकाळी तीव्र गारठा

  • दुपारी कडक ऊन, रात्री पुन्हा थंडी

  • बदलत्या हवामानामुळे सर्दी-खोकल्याच्या तक्रारी वाढल्या

उत्तरेकडील शीत वारे मंदावल्यामुळे राज्यात थंडीचा कडाका कमी झाला आहे. मात्र थोड्या अधिक प्रमाणात वातावरणात गारठा कायम आहे. किमान तापमानात हळूहळू वाढ होत असून, काही ठिकाणी पहाटे धुके तर दुपारी तीव्र ऊन पाहायला मिळत आहे. आज राज्याच्या किमान तापमानात काही अंशी वाढ होण्याची, तसेच थंडी कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

किमान तापमानाचा पारा १० अंशांच्या खाली आल्यास तसेच तापमानात सरासरीच्या तुलनेत ४.५ अंशांची घट झाल्यास थंडीचा लाट, तर तापमानात ६.५ अंशांपेक्षा अधिक घट झाल्यास तीव्र लाट आल्याचे समजले जाते. गुरुवारी गोंदीया येथे ८.४ अंश, अहिल्यानगर येथे ८.६ तर नांदेड येथे ८.९ अंशाची नोंद झाली आहे.

Today Winter Temprature : राज्यात तापमानात चढ-उतार! 'या' जिल्ह्यांत पारा १० अंशाच्या खाली; वाचा आजचे हवामान कसे असेल?
Pune : “आम्ही इथले भाई” कोयत्याने वाहनांची तोडफोड करणाऱ्या तरुणांची पोलिसांनी जिरवली

तसेच मराठवाड्यातील अनेक भागात किमान तापमानात घट झाली आहे. राज्यातील मालेगाव, नाशिक, मोहोळ, जळगाव, यवतमाळ येथे १० अंशाच्या खाली तापमान होते. आज राज्याच्या किमान तापमानात चढ-उतार होत, थंडी कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

Today Winter Temprature : राज्यात तापमानात चढ-उतार! 'या' जिल्ह्यांत पारा १० अंशाच्या खाली; वाचा आजचे हवामान कसे असेल?
Viral Video : हायफाय राहणं, फाडफाड इंग्लिश, क्रिकेटरची बायको, एकेकाळी स्वतःची विमान कंपनी; भीक मागण्याची वेळ, VIDEO व्हायरल

छत्रपती संभाजीनगरमध्ये आज सकाळी तापमानाचा पारा हा दहा अंश सेल्सिअसच्या खाली गेलेला जाणवला. सकाळपासून थंडीचा गारठा वाढल्यामुळे शेकोट्या पेटलेल्या दिसत आहे. मागच्या आठवड्यात अचानक थंडीचा कडाका वाढला होता. त्यानंतर पुन्हा थंडी कमी झाली होती. आज पुन्हा वाढ होऊन आज सकाळपासून थंडी अधिक जाणवू लागली आहे. पुढील काही दिवस अशीच थंडी राहणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. दरम्यान राज्यातील तापमानात सतत होणारा बदल नागरिकांना तापदायक ठरत आहे. बदलत्या वातावरणामुळे नागरिकांना सर्दी, खोकल्यासारख्या आजारांना सामोरे जावं लागतं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com