Pune : “आम्ही इथले भाई” कोयत्याने वाहनांची तोडफोड करणाऱ्या तरुणांची पोलिसांनी जिरवली

Pune Pimpari Chinchwad Crime : पिंपरी चिंचवडमधील दत्त मंदिर रोड परिसरात कोयत्याने वाहनांची तोडफोड करणाऱ्या गुंडांना वाकड पोलिसांनी अवघ्या काही तासांत अटक केली. आरोपींचा माफी मागतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
Pune : “आम्ही इथले भाई” कोयत्याने वाहनांची तोडफोड करणाऱ्या तरुणांची पोलिसांनी जिरवली
Pune Pimpari Chinchwad CrimeSaam Tv
Published On
Summary
  • वाकडमधील दत्त मंदिर रोड परिसरात मध्यरात्री गुंडगिरी

  • कोयत्याने वाहनांची मोठ्या प्रमाणात तोडफोड

  • सीसीटीव्हीच्या आधारे काही तासांत आरोपी अटकेत

  • पोलिस कारवाईनंतर आरोपींचा माफी मागतानाचा व्हिडिओ व्हायरल

गोपाळ मोटघरे, पुणे

पिंपरी चिंचवड शहरातील दत्त मंदिर रोड परिसरात कोयत्याने वाहनांची तोडफोड करत दहशत निर्माण करणाऱ्या गुंडांना वाकड पोलिसांनी अवघ्या काही तासांत बेड्या ठोकल्या आहेत. "आम्ही इथले भाई आहोत" अस म्हणणाऱ्या या तरुणांची गुंडगिरी पोलिसांनी चांगल्याच प्रकारे उतरवली असून, आता या आरोपींचा पोलिसांची आणि जनतेची माफी मागतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे.

सोमवारी रात्री अडीचच्या सुमारास वाकडमधील दत्त मंदिर रोड परिसरात आरोपींनी हातात कोयते घेऊन धुडगूस घातला होता. यावेळी त्यांनी रस्त्यावरील वाहनांची मोठ्या प्रमाणावर तोडफोड केली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता.

Pune : “आम्ही इथले भाई” कोयत्याने वाहनांची तोडफोड करणाऱ्या तरुणांची पोलिसांनी जिरवली
Today Weather : राज्यात थंडीचा कहर! जेऊरचा पारा ६ अंशांवर, मध्य महाराष्ट्रात ‘येलो अलर्ट’, आज कसं असेल हवामान? वाचा

या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे वाकड पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. अवघ्या काही तासांतच पोलिसांनी मुख्य आरोपींना अटक केली. यात अर्जुन मल्हारी देवकांबळे ,गजानन बापूराव पाचपिल्ले, गौरव सुनील जाधव यांचा समावेश असून एका अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेण्यात आले आहे.

Pune : “आम्ही इथले भाई” कोयत्याने वाहनांची तोडफोड करणाऱ्या तरुणांची पोलिसांनी जिरवली
Todya Winter Temprature : महाराष्ट्रात थंडी ओसरली! धुळे, निफाड, जेऊरमध्ये तापमान १० अंशावर; वाचा हवामानाचा अंदाज

अटकेनंतर पोलिसांनी या गुन्हेगारांना त्यांची जागा दाखवून दिली. "आम्ही जे केलं ते चुकीचं होतं, कुणीही असं करू नये," असे म्हणत हे तरुण आता हात जोडून नागरिकांची माफी मागत आहेत. वाकड पोलिसांनी केलेल्या या धडक कारवाईचे सर्वत्र कौतुक होत असून, यामुळे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या तरुणांना जरब बसली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com