Crime: टिटवाळा हादरले! भाचीची छेड काढणाऱ्यांविरोधात पोलिसात तक्रार, संतापलेल्या ३ तरुणांकडून मामाची हत्या

Titwala Crime: टिटवाळ्यामध्ये भयंकर हत्याकांडाची घटना समोर आली आहे. अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या आरोपीविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार देण्याचा सल्ला दिल्याच्या रागातून तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली.
Crime: टिटवाळा हादरले! भाचीची छेड काढणाऱ्यांविरोधात पोलिसात तक्रार, संतापलेल्या ३ तरुणांकडून मामाची हत्या
Titwala CrimeSaam tv
Published On
  • टिटवाळ्यात तरुणाची निर्घृण हत्या

  • पोलिसात तक्रार देण्याचा सल्ला दिल्याने हत्या

  • अल्पवयीन मुलीच्या छेडछाड प्रकरणातून खून

  • टिटवाळा पोलिसांनी तिघांना केली अटक

संघर्ष गांगुर्डे, कल्याण

कल्याण नजीकच्या टिटवाळा परिसरात एका व्यक्तीची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली. अल्पवयीन भाचीची छेड काढल्यामुळे या व्यक्तीने आरोपी तरुणांविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचा सल्ला पीडित मुलीच्या आईला दिला होता. हाच राग मनात ठेवत आरोपींनी मुलीच्या मानलेल्या मामाची भरचौकात निर्घृण हत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी तिन्ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली.

मिळालेल्या माहितीनुसार, टिटवाळा परिसरातील म्हारळ गावात एका अल्पवयीन मुलीची छेड काढल्याच्या प्रकरणातून भयंकर हत्याकांड उघडकीस आले आहे. दीपक डांगे या तरुणाने अल्पवयीन मुलीची छेड काढली. या प्रकरणी मुलीचे मानलेले मामा रविंद्र उर्फ पिंट्या अहिरे याने टिटवाळा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचा सल्ला बहिणीला दिला होता. याच रागातून आरोपी दीपक डांगे आणि त्याच्या मित्रांनी पिंट्या अहिरे याची हत्या केली. या घटनेमुळे टिटवळ्यात एकच खळबळ उडाली.

Crime: टिटवाळा हादरले! भाचीची छेड काढणाऱ्यांविरोधात पोलिसात तक्रार, संतापलेल्या ३ तरुणांकडून मामाची हत्या
Crime: गर्लफ्रेंडने बॉयफ्रेंडला रॉकेल ओतून जिवंत जाळलं; प्रपोज करते म्हणत खुर्चीवर बसवलं, डोळ्यांवर पट्टी अन् हात-पाय बांधले नंतर...

म्हारळ गावातील दीपक डांगेने आपल्या मानलेल्या बहिणीच्या अल्पवयीन मुलीची छेड काढल्याचा प्रकार घडला होता. या घटनेनंतर संबंधित मुलीच्या कुटुंबीयांमध्ये संतापाचे वातावरण होते. रविंद्र अहिरेने मुलीच्या आईला आरोपीविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार करण्याचा सल्ला दिला होता. याचाच राग मनात धरून आरोपींनी रविंद्रला संपवण्याचा कट रचल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे.

Crime: टिटवाळा हादरले! भाचीची छेड काढणाऱ्यांविरोधात पोलिसात तक्रार, संतापलेल्या ३ तरुणांकडून मामाची हत्या
Beed Crime : बीड हादरलं! हॉटेल व्यवसायिकाची भर रस्त्यात निर्घृण हत्या, धक्कादायक कारण समोर

शुक्रवारी रात्री म्हारळ गावातील मलखांब कंपाऊंड परिसरात रविंद्र अहिरे याच्यावर तिघांनी धारदार शस्त्रांनी हल्ला केला. आरोपींनी त्याच्या डोक्यावर, पोटावर, चेहऱ्यावर आणि शरीराच्या विविध भागांवर सपासप वार केले. गंभीर जखमी अवस्थेत रविंद्रला रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

Crime: टिटवाळा हादरले! भाचीची छेड काढणाऱ्यांविरोधात पोलिसात तक्रार, संतापलेल्या ३ तरुणांकडून मामाची हत्या
Crime: दुहेरी हत्याकांडाने विरार हादरले, घरात घुसून मायलेकीची हत्या; नंतर आरोपीने उचललं टोकाचं पाऊल

घटनेची माहिती मिळताच टिटवाळा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. तांत्रिक माहिती आणि स्थानिक सूत्रांच्या मदतीने टिटवाळा पोलिसांनी अल्पावधीतच दीपक डांगे, विजय भिडे आणि परशुराम भिडे या तिघांना अटक केली. या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करण्या आला आहे. आरोपींनी हल्ल्यासाठी वापरलेले शस्त्र, पूर्वीचे वाद आणि अन्य कारणांचा पोलिस सखोल तपास करत आहेत. म्हारळ परिसरातील या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

Crime: टिटवाळा हादरले! भाचीची छेड काढणाऱ्यांविरोधात पोलिसात तक्रार, संतापलेल्या ३ तरुणांकडून मामाची हत्या
Crime News: ऑपरेशन थिएटरमध्ये नेलं, गुंगीचं औषधं देऊन केला बलात्कार; विद्यार्थीनीवर अत्याचार करणाऱ्या डॉक्टरला अटक

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com