

लखनऊच्या तेजस रुग्णालयात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या रूग्णालयात उपचारांसाठी आलेल्या एका विद्यार्थिनीवर झालेल्या बलात्काराच्या प्रकरणामुळे खळबळ उडालीये. पीडितेने रुग्णालयाचे डॉक्टर विजय कुमार गिरी यांच्यावर बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. डॉक्टरने तिला गुंगीचं औषध देऊन तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप आहे. यावेळी पोलिसांनी आरोपी डॉक्टरला अटक केलीये.
मिळालेल्या माहितीनुसार, लखनऊच्या बक्षी तलाव भागातील तेजस रुग्णालयात एका १९ वर्षीय बारावीच्या विद्यार्थिनीला उपचारासाठी आणण्यात आलं होतं. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, तिला फीट्स येण्याचा त्रास होत होता. तीन दिवसांपूर्वी त्या विद्यार्थिनीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, डॉ. विजय गिरी यांनी ट्यूब टाकण्याचा सल्ला दिला आणि तिला ऑपरेशन थिएटरमध्ये नेले. पीडितेची बहीण तिच्यासोबत होती पण तिला परत बाहेर पाठवण्यात आलं.
पीडितेच्या म्हणण्यानुसार, तिला एक इंजेक्शन देण्यात आलं ज्यामुळे ती अर्धवट बेशुद्ध झाली. त्यानंतर डॉक्टरने तिच्यावर बलात्कार केला. तिची प्रकृती अधिकच खालावली होती. शुद्धीवर आल्यानंतर पीडितेने तिच्या कुटुंबीयांना या घटनेबद्दल सांगितलं ज्यामुळे एकच गोंधळ उडाला. कुटुंबीयांनी रुग्णालयात मोठा आरडाओरडा केला.
घटनेची माहिती मिळताच, स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी तिला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवलं. आरोपी डॉक्टरला ताब्यात घेण्यात आलं असून त्याची चौकशी सुरू आहे. वैद्यकीय अहवाल मिळाल्यानंतर त्याच्यावर गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला जाईल, असं पोलिसांचं म्हणणं आहे. पोलीस पुढील कारवाईची तयारी करत आहेत.
या प्रकरणी उत्तरचे एडीसीपी टिंकल जैन यांनी सांगितलं की, तेजस रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या एका तरुणीवर ऑपरेशन थिएटरमध्ये एका डॉक्टरने बलात्कार केल्याची माहिती बीकेटी पोलीस ठाण्याला मिळाली होती. या माहितीच्या आधारे गुन्हा दाखल केला जातोय. आरोपी डॉक्टरला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी सुरू आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.