Pune crime news: पुण्यात रक्तरंजित थरार! बायकोशी अफेअर असल्याचा संशय; नवऱ्याने तरुणाला क्रूरपणे संपवलं

पुण्यातील वडगाव बुद्रुक परिसरात अनैतिक संबंधाच्या संशयातून ४१ वर्षीय व्यक्तीचा धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला. आरोपी फरार असून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
Pune crime news
Pune crime newsSaam Tv News
Published On

पुण्यातील वडगाव बुद्रुक परिसरात रविवारी रात्री धक्कादायक घटना घडली. अनैतिक संबंधाच्या संशयातून एका ४१ वर्षीय व्यक्तीचा भर रस्त्यात धारदार शस्त्राने वार करून निर्घृण खून करण्यात आला. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. रुपेश सुरेश भादिर्गे असं मृत व्यक्तीचं नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, आरोपी युवराज गेजगे याच्या पत्नीचे आणि रुपेश भादिर्गे याचे अनैतिक संबंध असल्याचा संशय आरोपीला होता. याच कारणावरून आरोपीच्या मनात रुपेश यांच्याबद्दल तीव्र राग निर्माण झाला होता. रविवारी रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास वडगाव बुद्रुक परिसरात आरोपीने रुपेश यांना गाठलं. यावेळी दोघांमध्ये जोरदार वाद झाला. काही वेळातच या वादाचे रूपांतर हल्ल्यात झालं.

Pune crime news
Shocking : धक्कादायक! हॉटेलच्या बंद खोलीत तरुणी आणि पुरुष नको त्या अवस्थेत, पोलिसांनी छापा टाकताच भयंकर सत्य आलं समोर

रूपेशवर धारदार शस्त्राने केले वार

रागाच्या भरात आरोपी युवराज गेजगे याने जवळ असलेल्या तीक्ष्ण धारदार हत्याराने रुपेश यांच्यावर सपासप वार केले. मानेवर, डोक्यावर आणि चेहऱ्यावर गंभीर जखमा झाल्याने रुपेश हे रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. स्थानिक नागरिकांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली. मात्र गंभीर दुखापतीमुळे रुपेश यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

Pune crime news
Crime: हात-पाय बांधले, तोंडात कापड कोंबलं; नंतर महिलेला जागीच संपवलं, गावात उडाली खळबळ

घटनेनंतर आरोपी युवराज गेजगे हा तेथून फरार झाला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. याप्रकरणी आरोपी युवराज गेजगे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा शोध सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com