Beed Crime : बीड हादरलं! हॉटेल व्यवसायिकाची भर रस्त्यात निर्घृण हत्या, धक्कादायक कारण समोर

Beed Parali Murder Crime News : बीडच्या परळी शहरात हॉटेल व्यवसायिक कारभारी आंधळे यांची मध्यरात्री धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
PARLI BEED MURDER CASE: HOTEL BUSINESSMAN KILLED IN MIDNIGHT ATTACK
PARLI BEED MURDER CASE: HOTEL BUSINESSMAN KILLED IN MIDNIGHT ATTACKSaam Tv
Published On
Summary
  • परळीमध्ये मध्यरात्री हॉटेल व्यवसायिकाची हत्या

  • धारदार शस्त्राने मानेवर वार करून हत्या

  • मुलगा सोबत नसल्याचा आरोपींनी घेतला फायदा

  • पोलिसांकडून तपास सुरू, परिसरात भीतीचे वातावरण

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला वर्ष उलटून गेली तरी त्यांच्या मारेकऱ्याला अद्याप कोणतीही शिक्षा सुनावण्यात आली नाही. अशातच आता बीडच्या परळीमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. परळी शहरातील नवीन अरुणोदय मार्केट परिसरात हॉटेल व्यवसायिक कारभारी आंधळे यांची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. या घटनेने संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. ही घटना मध्यरात्री अरुणोदय मार्केट ते बस स्टँड रोडवरील मैदानात घडली. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास सुरु आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हॉटेल व्यवसायिक कारभारी आंधळे हे नेहमीप्रमाणे गावाकडे जात होते. नेहमी त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा असायचा, हत्येच्या दिवशी मात्र तो त्यांच्यासोबत नव्हता. याचाच फायदा घेत दोन आरोपींनी त्यांच्यावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला केला. हल्लेखोरांनी त्यांच्या मानेवर धारदार शस्त्राने वार केल्याने ते गंभीर जखमी झाले.

PARLI BEED MURDER CASE: HOTEL BUSINESSMAN KILLED IN MIDNIGHT ATTACK
Chia Seeds : वजन कमी करण्यासाठी पाण्यातून सब्जा पिता? थांबा, आधी जाणून घ्या पिण्याची योग्य पद्धत

जखमी अवस्थेत असतानाच आंधळे यांनी आपल्या मुलाला फोन केला. घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी रात्रीच घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह पुढील तपासणीसाठी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात पाठवला. मात्र डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले.

PARLI BEED MURDER CASE: HOTEL BUSINESSMAN KILLED IN MIDNIGHT ATTACK
Shocking : नवऱ्यापासून घटस्फोट घेतला, मावशीच्या मुलासोबत रिलेशनमध्ये आली; बॉयफ्रेंडने असं काही केलं की महिला हादरून गेली

पैशाच्या देवाण-घेवाणीवरून हा वाद झाल्याची माहिती फिर्यादी ओमकेश कारभारी आंधळे यांनी आपल्या फिर्यादीमध्ये दिली आहे . दरम्यान,या प्रकरणात परळी शहर पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल केला असून आज सकाळी एका आरोपीला ताब्यात घेतले. मात्र दुसरा आरोपी फरार झाल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे.

PARLI BEED MURDER CASE: HOTEL BUSINESSMAN KILLED IN MIDNIGHT ATTACK
Shocking : भयंकर! पत्नीला बॉयफ्रेंडसोबत नको त्या अवस्थेत पाहिलं, संतापलेल्या पतीने काढला काटा; रात्रभर मृतदेहाशेजारी बसला

या घटनेमुळे परळी शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून व्यापारी व नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. हत्या मागील नेमके कारण काय, किती आरोपी सहभागी होते, याचा तपास परळी शहर पोलीस करीत असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पुढील तपास सुरू असल्याची माहिती दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com