शाळेच्या सहलीला गेले, ५५-६० विद्यार्थ्यांना विषबाधा; ठाण्यातील घटनेने खळबळ, पालकांमध्ये भीती

Thane School Students Food Poisoning During Mumbai Trip: ठाण्यातील खासगी शाळेच्या सहलीदरम्यान ५५ ते ६० विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अनेक विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून या प्रकरणी सखोल चौकशीची मागणी करण्यात आली आहे.
Students fall sick after consuming food during a school trip in Mumbai; several hospitalized, triggering panic among parents
Students fall sick after consuming food during a school trip in Mumbai; several hospitalized, triggering panic among parentsSaam tv
Published On

विकास काटे, साम टीव्ही

ठाणे महापालिका कार्यक्षेत्रातील वर्तकनगर येथील एका खाजगी शाळेतील सुमारे १६० मुलं सहलीला गेले असताना ५५ ते ६० विद्यार्थ्यांना शैक्षणिक सहलीदरम्यान अन्नातून विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या गंभीर प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करून जबाबदार व्यक्ती आणि शाळा प्रशासनावर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी ठाणे महापालिकेचे उपमहापौर कृष्णा दादू पाटील यांनी जिल्हाधिकारी आणि शाळा प्रशासन तसेच महापालिका आयुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे.

Students fall sick after consuming food during a school trip in Mumbai; several hospitalized, triggering panic among parents
Mumbai Ahmedabad bullet train : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनबाबत सर्वात मोठी अपडेट; मुंबईपर्यंत कधी पोहोचणार? रेल्वेमंत्र्यांनी सांगितले महत्वाचे टप्पे

त्या खासगी शाळेतील इयत्ता तिसरी आणि चौथीच्या विद्यार्थ्यांना १ व २ जुलै रोजी मुंबईतील लोअर परळ येथे एका विज्ञान विषयक कार्यक्रमासाठी १६० मुलांना त्या खासगी शाळेतर्फे नेण्यात आले होते. या प्रवासादरम्यान शाळा प्रशासनाने ठरवून दिलेल्या ट्रॅव्हल्स कंपनीमार्फत विद्यार्थ्यांच्या अल्पोपहार आणि भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र, हा आहार घेतल्यानंतर तब्बल ५५ ते ६० विद्यार्थ्यांना उलट्या आणि जुलाबाचा तीव्र त्रास सुरू झाला. परिस्थिती बिघडल्याने अनेक विद्यार्थ्यांना ठाण्यातील इतर खाजगी रुग्णालयांमध्ये तातडीने उपचारासाठी दाखल करावे लागले. यामुळे पालक वर्गात प्रचंड चिंतेचे आणि भीतीचे वातावरण आहे.

Students fall sick after consuming food during a school trip in Mumbai; several hospitalized, triggering panic among parents
Building Collapse : पिंपरी - चिंचवडमध्ये इमारत कोसळली, अनेक नागरिक दबल्याची भीती, VIDEO

या घटनेनंतर शाळा प्रशासनाने आपली चूक सुधारण्याऐवजी अत्यंत बेजबाबदार भूमिका घेतली असून"तुमच्या मुलांची रोगप्रतिकारक शक्ती (इम्युनिटी पॉवर) कमी आहे," असे सांगून शाळा प्रशासन पालकांना गप्प करण्याचा आणि प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे.

Students fall sick after consuming food during a school trip in Mumbai; several hospitalized, triggering panic among parents
Medicine Price Drop: बीपी, हार्ट अटॅक आणि डायबेटिस पेशंटला दिलासा; औषधं ४० टक्के स्वस्त, ३९ औषधांच्या किंमती होणार कमी

एकाच वेळी ५५ हून अधिक मुलांना त्रास होणे हा केवळ वैयक्तिक इम्युनिटीचा भाग असूच शकत नाही, हे स्पष्ट असतानाही शाळा आपली जबाबदारी झटकत आहे.उपमहापौर कृष्णा पाटील यांनी यावर तीव्र आक्षेप घेतला असून, शाळा प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याऐवजी पालकांकडे दुर्लक्ष केल्याचे पत्रात म्हटले आहे. विषबाधेचे नेमके कारण काय? यासाठी कोण दोषी आहे? याची निष्पक्ष चौकशी करून वस्तुस्थिती जनतेसमोर आणली पाहिजे. तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय करावेत, अशी मागणी उपमहापौर कृष्णा पाटील यांनी लावून धरली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com