Building Collapse : पिंपरी - चिंचवडमध्ये इमारत कोसळली, अनेक नागरिक दबल्याची भीती, VIDEO

Building Collapse in Pimpri Chinchwad : पुण्यातील पिंपरी-चिंचवडमध्ये इमारत कोसळली. ढिगाऱ्याखाली अनेक नागरिक दबल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

गोपाळ मोटघरे, पिंपरी-चिंचवड | साम टीव्ही

गेल्या काही दिवसांपासून पुणे, पिंपरी-चिंचवडसह ग्रामीण भागात पावसानं धुमाकूळ घातला आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये इमारत कोसळल्याची घटना घडली. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. इमारत कोसळल्यानंतर ढिगाऱ्याखाली अनेक नागरिक दबल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

प्राथमिक माहितीनुसार, मोशी कचरा डेपोजवळ ही धक्कादायक घटना घडली आहे. इमारत कोसळली असून, ढिगाऱ्याखाली १४ जण अडकल्याची माहिती समजते. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस, अग्निशमन दल आणि बचावपथके घटनास्थळी पोहोचली आहेत. मदत आणि बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.

ही इमारत काही वर्षांपूर्वीच बांधण्यात आली होती. मात्र, ही इमारत कोसळल्याने बांधकामाच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com