Shreya Maskar
जेव्हा तुम्हाला जुलाब होतात, तेव्हा पोटदुखी, पोटात गोळे येणे, पोट फुगणे, थकवा, उलट्या, ताप या समस्या उद्भवतात.
दूध, चीज आणि आईस्क्रीममध्ये लॅक्टोज असते, जे पचायला जड असू शकते आणि तुम्हाला सामान्यतः लॅक्टोजची ॲलर्जी नसली तरीही त्यामुळे गॅस आणि पोट फुगण्याचा त्रास होऊ शकतो, ज्यामुळे वारंवार जुलाब होतात.
धान्य, कच्च्या भाज्या आणि सुकामेवा हे पदार्थ तुमच्या पचनसंस्थेवर अतिरिक्त ताण टाकू शकतात. त्यामुळे तुम्हाला उलट्या- जुलाब होत असेल तेव्हा यांचे सेवन टाळा.
तेलकट पदार्थ, फास्ट फूड आणि जास्त तेल लावलेले मांस पचायला जड असतात आणि त्यामुळे जुलाबाचा त्रास वाढू शकतो.
तिखट सॉस, करी आणि लिंबूवर्गीय फळे तुमच्या पोटाच्या आणि आतड्यांच्या अस्तराला त्रास देऊ शकतात, परिणामी पोटदुखी वाढते आणि जुलाब सुरू होतात.
कॉफी, एनर्जी ड्रिंक्स आणि अल्कोहोल हे पदार्थ खाणे टाळा. यामुळे तुम्हाला वारंवार वॉशरुमला जावे लागले. अतिसार झाल्यावर साखर, प्रक्रिया केलेले पदार्थ, कच्च्या भाज्या, कांदे, लिंबूवर्गीय फळे हे पदार्थ खाणे टाळा, यामुळे पचनसंस्थेवर गंभीर परिणाम होतो.
जेव्हा तुम्हाला अतिसार होतो, तेव्हा शरीरातील पाण्याची पातळी टिकवून ठेवण्यासाठी तुम्ही भरपूर पाणी प्यावे. केळी, भात, सफरचंद हे पदार्थ खा.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.