Acidity : पावसाळ्यात वारंवार ॲसिडीटी होते? रोज प्या 'हा' ज्यूस, गॅस अन् पोटदुखीवर मिळेल आराम

Shreya Maskar

पावसाळा - ॲसिडीटी

पावसाळ्यात ॲसिडीटी हा मुख्यत: जास्त आर्द्रतेमुळे होतो, ज्यामुळे तुमच्या शरीराची पचनक्रिया मंदावते. जेव्हा पचन मंदावते तेव्हा अन्न जास्त काळ पोटात राहते, परिणामी ॲसिडीटी वाढते. आहारातील बदल, जिवाणू संसर्ग आणि पाणी दूषित झाल्यामुळे पोट खराब होते.

Monsoon - Acidity | pinterest

ॲसिडीटी

सेलेरी प्रामुख्याने ॲसिडिटी रोखण्यास मदत करते कारण ती अत्यंत अल्कधर्मी असते आणि त्यात सुमारे ९५% पाणी असते.

Acidity | pinterest

सेलेरी फायदे

सेलरीमुळे अपचनाची समस्या उद्भवत नाही. तसेच पोटात आणि छातीत जळजळ होत असेल तर ती लगेच थांबते. तसेच पोटाला थंडावा मिळतो.

Celery benefits | pinterest

सेलेरी ज्यूस साहित्य

सेलेरीला अजमोदा असेही म्हणतात. सेलेरीचा ज्यूस बनवण्यासाठी पाणी आणि अजमोदाची पाने/अजमोदाच्या बिया इत्यादी साहित्य लागते.

Celery juice ingredients | pinterest

सेलेरी ज्यूस रेसिपी

सेलेरी ज्यूस बनवण्यासाठी एका मोठ्या भांड्यात एक ग्लास पाणी चांगले उकळून घ्या. त्यात अजमोदाची पाने टाकून २-३ मिनिटे मंद आचेवर शिजू द्या आणि मिश्रण गाळून घ्या. तुम्ही यात आले किंवा लिंबू देखील मिक्स करू शकता.

Celery Juice Recipe | pinterest

ज्यूस कधी प्यावा?

सेलेरीचा छोटा एक ग्लास ज्यूस सकाळी रिकाम्या पोटी प्यायल्याने ॲसिडीटीची कोणतीच समस्या उद्भवत नाही आणि तुमचा दिवसही चांगला जातो.

juice | saam tv

पचनक्रिया सुरळीत

अजमोदा पोटात गॅस दूर करून पचनक्रिया सुरळीत करते. यामुळे तुम्हाला आंबट ढेकर देखील येत नाही. तसेच उलट्या, पोटदुखी, पोट फुगणे , गॅस यांसारख्या समस्या उद्भवत नाही.

Smooth digestion | pinterest

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Note | pinterest

NEXT : ॲसिडीटीला करा टाटा बाय बाय; पावसाळ्यात खा 'या' ५ सुपरहेल्दी भाज्या, पचनक्रिया होईल सुरळीत

Acidity | saam tv
येथे क्लिक करा...