

बारावीला विज्ञान शाखेत ९५.७ टक्के गुण मिळाले. प्रवेश परीक्षेच्या गुणांच्या आधारे हव्या असलेल्या किंवा मनासारख्या कॉलेजला प्रवेश न मिळाल्याने नैराश्येतून १७ वर्षीय विद्यार्थ्यानं टोकाचं पाऊल उचललं. ठाण्यातील हायप्रोफाइल परिसरात ही दुर्दैवी घटना घडली. मानसिक तणावातून त्यानं इमारतीच्या २३ व्या मजल्यावरून उडी मारून जीवनयात्रा संपवल्याची प्राथमिक माहिती आहे.
विद्यार्थ्याला उच्च शिक्षण घ्यायचं होतं. पण मनासारख्या कॉलेजला अॅडमिशन मिळू न शकल्यानं तो नैराश्येत गेला होता. त्यानं इमारतीच्या २३ व्या मजल्यावरून खाली उडी मारून आत्महत्या केली. ठाण्याच्या कासारवडवली परिसरात ही घटना घडली. यावर्षी त्यानं अभियांत्रिकी प्रवेशासाठी प्रयत्न केले. पण अपेक्षित शैक्षणिक संस्थेत त्याला प्रवेश मिळू शकला नाही, अशी माहिती प्राथमिक तपासात समोर आली आहे.
वृत्तानुसार, ४ सप्टेंबर रोजी संध्याकाळी साधारण साडेसातच्या सुमारास बाहेर जातो असे सांगून मुलगा घरातून निघून गेला. रात्री सव्वाआठ वाजताच्या सुमारास त्यानं अचानक कुटुंबाच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर आत्महत्या करत असल्याचा मेसेज पाठवला. पण त्यानंतर त्याचा मोबाइल बंद झाला. त्याच्या कुटुंबीयांनी कासारवडवली पोलिसांशी संपर्क साधला आणि त्याचा शोध सुरू केला.
पोलिस आणि कुटुंबीयांनी आसपासच्या परिसरात मुलाचा शोध घेतला. तो इमारतीखालच्या फुटपाथवर गंभीर अवस्थेत आढळून आला. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. पण दाखल करण्यापूर्वीच डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. इच्छेप्रमाणे शैक्षणिक संस्थेत प्रवेश न मिळाल्यानं त्यानं टोकाचं पाऊल उचलल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. कुटुंबीयांनीही कोणताही संशय व्यक्त केला नसून, त्यांच्याकडून तक्रार नसल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निवृत्ती कोल्हटकर यांनी सांगितले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.