Pune Crime: पुण्यात पोलिसावर जीवघेणा हल्ला, भररस्त्यात चौघांकडून चाकूने सपासप वार

Pune Police: पुण्यात पोलिसावर चौघांनी चाकूने हल्ला केला. ड्युटीवरून घरी जात असताना पोलिसासोबत ही भयंकर घटना घडली. या हल्ल्यात पोलिस गंभीर जखमी झाला.
Pune Crime: पुण्यात पोलिसावर जीवघेणा हल्ला, भररस्त्यात चौघांकडून चाकूने सपासप वार
Pune Police AttackSaam Tv
Published On
  • पुण्यात रेल्वे पोलिस कर्मचाऱ्यावर चौघांचा जीवघेणा हल्ला

  • पुणे रेल्वे स्थानक परिसरात पोलिसावर चाकूने हल्ला

  • पोलिस कर्मचारी अक्षय बोंबाळे चाकू हल्ल्यात जखमी

  • पोलिसाच्या गळ्यावर आणि छातीवर चाकूने वार

  • चार आरोपींविरोधात गुन्हा दाखल

अक्षय बडवे, पुणे

पुण्यात पोलिसावर चाकू हल्ला करण्यात आल्याची भयंकर घटना घडली. पुणे रेल्वे स्थानक परिसरात पोलिसावर चाकूने सपासप वार करण्यात आले. या हल्ल्यात पोलिस गंभीर जखमी झाला. ४ जणांनी पोलिसाला गाठून त्याच्यावर हल्ला केला. अक्षय बोंबाळे असे जखमी झालेल्या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव असून ते सध्या रेल्वे पोलिसात कार्यरत आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी ४ जणांविरोधात पुण्यातील बंड गार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना मंगळवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयाच्या समोरील बाजूस घडली. याप्रकरणी स्वतः पोलिस कर्मचाऱ्याने पोलिसात तक्रार दिली. यावरून विकी पात्र आणि रॉकी पात्र तसेच त्यांचे इतर दोन अज्ञात साथीदार यांच्यावर बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर आरोपी फरार झाला असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. पोलिसावर हल्ला करण्यात आलेल्या घटनेमुळे पुण्यात खळबळ उडाली आहे.

Pune Crime: पुण्यात पोलिसावर जीवघेणा हल्ला, भररस्त्यात चौघांकडून चाकूने सपासप वार
Pune Crime: पुण्यात गोळीबाराचा थरार! बायकोसोबत टोकाचा वाद, नवऱ्याने स्वत:वरच झाडली गोळी

पोलिसांनी सांगितले की, पोलिस कर्मचारी अक्षय बोंबाळे हे काम संपवून उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयाच्या समोरील रोडवरून जात होते. यावेळी पोलिसाला आरोपी विकी, रॉकी आणि त्यांच्या दोन इतर साथीदारांनी अडवलं. 'मी विकीच्या आईला तो दारू आणि गांजा पितो असं सांगितलं' या गैरसमजातून त्यांच्यात वाद सुरू झाला. या गोष्टीचा राग मनात धरत आरोपींनी तुला आता जिवंत सोडणार नाही असं बोलून दोन अज्ञात साथीदारांच्या मदतीने पोलिसाला मारहाण केली.

Pune Crime: पुण्यात पोलिसावर जीवघेणा हल्ला, भररस्त्यात चौघांकडून चाकूने सपासप वार
Pune Crime: श्रावणात मटण अन् दारूसाठी मुलाचा हट्ट, संतापलेल्या बापाने घेतला जीव; पुण्यातील भयानक घटना

आरोपी ऐवढ्यावर थांबले नाहीत त्यांनी चाकूने पोलिसाच्या अंगावर सपासप वार केले. एकाने पोलिसाच्या गळ्यावर वार केले. तर दुसऱ्या आरोपीने पोलिसाच्या छातीवर वार केले. या घटनेत फिर्यादी गंभीर जखमी झाले. यावेळी आरोपींनी फिर्यादी यांच्या जवळ असलेला एक मोबाईल फोन आणि गळ्यातील सोन्याची चैनसुद्धा हिसकावली. या हल्ल्यानंतर आरोपी फरार झाले. याप्रकरणी अधिक तपास बंडगार्डन पोलिसांकडून सुरू आहे

Pune Crime: पुण्यात पोलिसावर जीवघेणा हल्ला, भररस्त्यात चौघांकडून चाकूने सपासप वार
Pune Crime: पुणे हादरले! अनैतिक संबंधातून भरचौकात तरुणाची हत्या, चाकूने सपासप वार करत संपवलं

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com