विकास काटे, साम टीव्ही
ठाणे महानगरपालिकेने शहरातील अनधिकृत पोस्टर्स, बॅनर्स, फ्लेक्स आणि होर्डिंग्जविरोधात महापालिकेने व्यापक मोहीम हाती घेतली. महापौर शर्मिला पिंपळोलकर व आयुक्त सौरभ राव यांच्या निर्देशानुसार शहराचे विद्रूपीकरण रोखण्याच्या उद्देशाने अतिक्रमण नियंत्रण व निष्कासन विभागाने संपूर्ण महापालिका हद्दीत विशेष मोहिम राबविली. 13 ते 20 जुलै या आठ दिवसांच्या मोहिमेत तब्बल 1524 अनधिकृत पोस्टर्स, बॅनर्स, फ्लेक्स व होर्डिंग्ज हटविण्यात आले असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात पाच फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
तीन हात नाका येथील पादचारी पुलावर लावण्यात आलेला अनधिकृत वाढदिवसाचा बॅनर 13 जुलै रोजी कोसळल्याची घटना घडली होती. त्यानंतर पालिकेला आता जग आली आहे. शहरातील सर्व अनधिकृत होर्डिंग्जवर कारवाई करण्याच्या सूचना प्रशासनास दिल्या होत्या. महापालिका आयुक्तांच्या निर्देशानुसार सर्व प्रभाग समिती हद्दीत कारवाईची मोहिम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेदरम्यान विनापरवानगी जाहिराती उभारणाऱ्यांविरोधात कठोर भूमिका घेत महापालिकेने फौजदारी कारवाईही केली. त्यानुसार नौपाडा-कोपरी प्रभाग समिती क्षेत्रात दोन, तर दिवा प्रभाग समिती क्षेत्रात तीन अशा एकूण पाच फौजदारी गुन्ह्यांची नोंद करण्यात आली.
नौपाडा-कोपरी प्रभाग समिती – 383
वागळे प्रभाग समिती – 115
लोकमान्य सावरकरनगर प्रभाग समिती – 178
वर्तकनगर प्रभाग समिती – 66
माजिवडा-मानपाडा प्रभाग समिती – 240
उथळसर प्रभाग समिती – 64
कळवा प्रभाग समिती – 142
मुंब्रा प्रभाग समिती – 36
दिवा प्रभाग – 300
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.