दिल्लीतील जंतर-मंतर येथे CJP आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळाला.
आंदोलक विद्यार्थ्यांनी पोलिसांवर मारहाणीचे गंभीर आरोप केले.
महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये आंदोलनाचे पडसाद उमटले.
'कॉक्रोच जनता पार्टी' (CJP) च्या आवाहनानंतर राजधानी दिल्लीतील जंतर-मंतर हे आंदोलनाचे मुख्य केंद्र बनलं. दिल्लीसह महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये आणि लडाखमध्ये या आंदोलनाचे तीव्र पडसाद उमटले. आंदोलना दडपून टाकण्यासाठी दिल्ली पोलिसांनी आंदोलक विद्यार्थ्यांना मारहाण केली. यामध्ये अनेकांची डोकी फोडली गेली. अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या. देशासह महाराष्ट्रात सुद्धा आंदोलनाचा भडका उडालाय. मुंबई, पुण्यासह कोल्हापूर, यवतमाळ जिल्ह्यातही विद्यार्थी रस्त्यावर उतरलेत.
दिल्लीतील जंतर-मंतर मैदानावर मोठ्या संख्येने विद्यार्थी आंदोलनासाठी जमले. मोर्चा निघण्यापूर्वीच पोलीस आणि सुरक्षा दलाच्या जवानांकडून लाठीचार्च करण्यात आला. या परिसरातील इंटरनेट सेवाही बंद करण्यात आली. दिल्लीतील आंदोलन पेटल्यानंतर महाराष्ट्रातील अनेक शहारातील युवकांनी आंदोलन केलं. रस्त्यावर उतरत त्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली. केंद्रीय शिक्षणमंत्री धमेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी त्यांनी केली. आंदोलन दपडण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर केला. त्यांनी मुलींना त्यांचे केस पकडून त्यांना ओढलं. त्याचे कपडे फाडले, असा गंभीर आरोपी मुंबईतील आंदोलनकांनी केलाय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.