विकास काटे, साम टीव्ही
टीडीसीसी बँक निवडणुकीत कपिल पाटील विरुद्ध किसन कथोरे यांच्या लढतीत कथोरे यांच्या नेतृत्वाखालील आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे समर्थित सहकार पॅनलने मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला. २७ जून रोजी झालेल्या मतदानानंतर २८ जून रोजी निकाल जाहीर करण्यात आला.
ठाणे जिल्हा सहकारी बँकेच्या बहुचर्चित निवडणुकीत सहकार पॅनलने दमदार कामगिरी करत मोठ्या मताधिक्याने विजय संपादन केला असून परिवर्तन पॅनलला पराभवाचा सामना करावा लागला आहे. २७ जून २०२६ रोजी पार पडलेल्या मतदानानंतर आज २८ जून २०२६ रोजी मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर निकाल जाहीर करण्यात आला. यात सहकार पॅनलने स्पष्ट आघाडी घेत विजय आपल्या नावावर केला.
सहकार पॅनलला राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थन होते. या पॅनलमध्ये ज्येष्ठ नेते किसन कथोरे, खासदार नरेश म्हस्के, तसेच कृषित ठाकूर यांच्यासह अनेक प्रमुख नेते आणि पदाधिकाऱ्यांचा सहभाग होता. दुसरीकडे परिवर्तन पॅनलमध्ये माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील, बाबाजी पाटील तसेच शिवसेना आणि भाजपशी संबंधित अनेक नेते व कार्यकर्त्यांचा पाठिंबा होता. मात्र, विविध राजकीय समीकरणे आणि जोरदार प्रचारानंतरही परिवर्तन पॅनल मतदारांचा विश्वास संपादन करण्यात अपयशी ठरले.
ठाणे जनता सहकारी बँकेची ही निवडणूक स्थानिक राजकारण आणि सहकार क्षेत्राच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जात होती. निकालाबाबत बँकेचे सभासद आणि राजकीय वर्तुळात मोठी उत्सुकता होती. निकाल जाहीर झाल्यानंतर सहकार पॅनलच्या समर्थकांनी आणि कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा करत एकमेकांना मिठाई भरवून आनंद व्यक्त केला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.