Nasrapur case : नसरापूर अत्याचारात नराधम दोषी, 29 जूनला भीमराव कांबळेला फाशी? कोर्टात नेमकं काय घडलं?

Nasrapur child rape and murder case verdict : नसरापूर येथील साडेतीन वर्षांच्या चिमुरडीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणात भीमराव कांबळे याला पुणे सत्र न्यायालयाने दोषी ठरवले आहे. अवघ्या ५२ दिवसांत खटल्याची सुनावणी पूर्ण झाली असून २९ जून रोजी शिक्षेवर अंतिम निर्णय होणार आहे.
PUNE NARSAPUR CHILD RAPE AND MURDER CASE VERDICT TODAY | WILL ACCUSED BHIMRAO KAMBLE GET DEATH PENALTY?
PUNE NARSAPUR CHILD RAPE AND MURDER CASE VERDICT TODAY | WILL ACCUSED BHIMRAO KAMBLE GET DEATH PENALTY?saam tv
Published On

Nasrapur case, Bhimrao Kamble : महाराष्ट्राला काळीमा फासणाऱ्या नसरापूर अत्याचार प्रकरणात पुणे सत्र न्यायालयानं विक्रमी वेळेच सुनावणी पूर्ण केलीय...साडेतीन वर्षांच्या चिमुरडीवरील अत्याचार करून हत्या करणाऱ्या नराधम भीमराव कांबळे याला न्यायालयानं अखेर दोषी ठरवलयं...अवघ्या 52 दिवसांच्या विक्रमी कालावधीत हा खटला पूर्ण झाला असून, महाराष्ट्रातील हा सर्वात वेगवान खटला ठरलाय.आता या नराधमाला काय शिक्षा होणार, याचा फैसला 29 जून रोजी होणार आहे. मात्र पीडितेच्या कुटुंबियांनी फाशीच्या शिक्षेची मागणी केलीय.

नसरापूर प्रकरणावर कोर्टात काय घडलं?

  • न्यायाधीश - तो प्रसंग आठव आणि तूच ठरव की तुला काय शिक्षा दिली पाहिजे?

  • दोषी भीमराव कांबळे - मी त्या दिवशी त्या मुलीला गाठीशेव खाण्यासाठी घेऊन गेलो होतो

  • दोषी भीमराव कांबळे - त्यावेळी मी पाय घसरून पडलो आणि त्याचवेळी त्या मुलीच्या डोक्यालाही मार लागला

  • दोषी भीमराव कांबळे - मी तिला शांत करण्याचा प्रयत्न केला, पण ती सारखी ओरडत होती

  • न्यायाधीश - आता तू जे सांगतोय तो इतिहास झालाय

  • न्यायाधीश - कारण तुझ्यावर गुन्हा सिद्ध झालाय. तुला कुठली शिक्षा द्यायला हवी?

  • दोषी भीमराव कांबळे - दोषी भीमराव कांबळेकडून काहीही उत्तर नाही

  • अजय मिसर, विशेष सरकारी वकील - भीमराव कांबळेला पश्चात्ताप नाही, तो दयेच्या लायकीचा नाही

  • अजय मिसर, विशेष सरकारी वकील - ज्या मुलीनं विश्वास ठेवला तिच्यावर 39 मिनिटं घृणास्पद प्रकार

  • अजय मिसर, विशेष सरकारी वकील- मुलीच्या अंगावर आरोपीकडून 18 जखमा

  • अजय मिसर, विशेष सरकारी वकील- आरोपीनं केवळ वासनेतून कृत्य केलं

  • अजय मिसर, विशेष सरकारी वकील- विश्वास निर्माण करायला आरोपीला मृत्यूदंडच हवा

PUNE NARSAPUR CHILD RAPE AND MURDER CASE VERDICT TODAY | WILL ACCUSED BHIMRAO KAMBLE GET DEATH PENALTY?
Ladki Bahin Yojana : आतापर्यंतचा सर्वात मोठा निर्णय; बोगस लाडक्या बहिणींकडून पैशांची वसुली, सरकारचा जिल्हाधिकाऱ्यांना थेट आदेश

राज्यात बलात्कार आणि हत्येच्या अनेक घटना घडतात. कुटुंबीयांच्या सांत्वनासाठी सरकार नेहमी जलदगतीनं खटला चालवण्याची घोषणा करतं. मात्र याची कधीही कठोर अंमलबजावणी होताना दिसत नाही. नसरापूर प्रकरणात न्यायालयानं जलद गतीनं सुनावणी करून महाराष्ट्रात एक नवा आदर्श निर्माण केलाय...त्यामुळे अशाच गंभीर प्रकरणांचाही निकाल कोर्ट लवकर लावणार का असा प्रश्न प्रत्येक पीडित कुटुंबाला नक्कीच पडला असणार.

ब्युरो रिपोर्ट, साम टिव्ही न्यूज

PUNE NARSAPUR CHILD RAPE AND MURDER CASE VERDICT TODAY | WILL ACCUSED BHIMRAO KAMBLE GET DEATH PENALTY?
Mumbai Crime : मुंबई हादरली! १० वर्षाच्या मुलासमोर महिलेवर बलात्कार; गळ्यावर कोयता ठेवून तडीपार गुंडाचं भयंकर कृत्य

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com