Bhiwandi Crime : भिवंडीत संतापजनक प्रकार, ७ वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार, भावाला पाणी आणायला पाठवलं अन...

Bhiwandi crime, child sexual assault : भिवंडीतील कशेळी परिसरात ७ वर्षांच्या चिमुरडीवर पैशांचे आमिष दाखवून कथित लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
Bhiwandi latest crime news
Bhiwandi latest crime newssaam tv
Published On

फय्याज शेख, भिवंडी प्रतिनिधी

नसरापूर प्रकरणात आरोपीला कोर्टाने दोषी ठरवल्याच्या दिवशीच राज्यात आणखी एका चिमुरडीवर बलात्कार झाल्याची संतापजनक घटना घडली. भिवंडी तालुक्यातील कशेळी परिसरात घराखाली भावासोबत खेळत असलेल्या एका ७ वर्षांच्या चिमुरडीला पैशांचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित चिमुरडी तिच्या भावासोबत घराखाली खेळत होती. यावेळी आरोपीने तिला खाऊ खाण्यासाठी पैशांचे आमिष दाखवले आणि बहाण्याने आपल्या फ्लॅटमध्ये घेऊन गेला. तिथे त्याने चिमुरडीवर अत्याचार केला. या अघोरी कृत्यानंतर पीडित मुलीची प्रकृती बिघडल्याने तिला तातडीने भिवंडीतील स्व. इंदिरा गांधी स्मृती उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेत नारपोली पोलिसांनी तात्काळ कारवाई करत, शहरातून फरार होण्याच्या तयारीत असलेल्या नराधम आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. अटक करण्यात आलेला आरोपी हा अल्पवयीन असल्याची प्राथमिक माहिती आहे. चिमुरडीच्या पालकांनी दाखवलेल्या प्रसंगावधानाने आणि तत्परतेने पोलिसांत तक्रार केल्यामुळे नराधमाचा पळून जाण्याचा डाव फसला.

Bhiwandi latest crime news
Nasrapur case : नसरापूर अत्याचारात नराधम दोषी, 29 जूनला भीमराव कांबळेला फाशी? कोर्टात नेमकं काय घडलं?

भावाला पाणी आणायला पाठवले आणि...

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, पीडित चिमुरडी आपल्या लहान भावासोबत घराखाली खेळत होती. यावेळी तिथे राहणाऱ्या आरोपीने तिला खाऊसाठी पैशांचे आमिष दाखवले आणि आपल्या फ्लॅटमध्ये घेऊन गेला. तिथे गेल्यानंतर आरोपीने मुलीच्या लहान भावाला पाणी आणण्यासाठी बाहेर पाठवले. भाऊ बाहेर जाताच आरोपीने चिमुरडीला घरात कोंडून तिच्यावर अत्याचार केला. काही वेळानंतर मुलीने रडत रडत पालकांना घडलेला सर्व प्रकार सांगितला. मुलीची अवस्था पाहून पालकांना मोठा धक्का बसला. त्यांनी तातडीने तिला रुग्णालयात दाखल केले आणि पोलिसांत धाव घेतली.

Bhiwandi latest crime news
Ketan Agarwal: सियाच्या भयंकर कृत्यानं वडिलांना मानसिक धक्का, ICU मध्ये उपचार; आई म्हणाली, तिलाही लोहगडावरुन ढकलून द्या

'तारीख पे तारीख नको, आरोपीचा एन्काऊंटर करा!'

या अमानुष घटनेची बातमी कशेळी परिसरात वाऱ्यासारखी पसरली. यामुळे संतप्त झालेल्या शेकडो नागरिकांनी आणि महिलांनी नारपोली पोलीस ठाण्याबाहेर प्रचंड गर्दी केली होती. नागरिकांच्या संतापाचा बांध फुटल्याने त्यांनी पोलिसांसमोरच जोरदार घोषणाबाजी सुरू केली. "या नराधमाला कोर्टात नेऊन 'तारीख पे तारीख' देण्याची गरज नाही, त्याचा थेट एन्काऊंटर करा!" अशी संतप्त मागणी नागरिकांनी लावून धरली.

दरम्यान, आरोपी हा कशेळीतील एका इमारतीमध्ये 'बॅचलर' म्हणून राहत होता. घरमालकाने कोणत्याही प्रकारची कायदेशीर पडताळणी (Police Verification) किंवा भाडेकरू करार (Rent Agreement) न करताच त्याला घर भाड्याने दिल्याचा गंभीर आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. याप्रकरणी पोलीस पुढील कायदेशीर कारवाई करत असून परिसरात सध्या तणावपूर्ण शांतता आहे.

Bhiwandi latest crime news
केंद्र सरकारचा एलपीजी गॅस सिलिंडरवर मोठा निर्णय, हॉटेल व्यावसायिकांना होणार फायदा, वाचा काय घेतला निर्णय?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com