संतापजनक! रात्री रस्त्यावर अर्धनग्न फिरत होता तरूण; फुटपाथवरील भटक्या कुत्रीवर अनैसर्गिक अत्याचार, सीसीटीव्हीत घटना कैद

Man Assaults Stray Dog Pimpri Chinchwad Arrested: पिंपरी-चिंचवडमध्ये भटक्या कुत्रीवर अत्याचार केल्याप्रकरणी ३५ वर्षीय आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
CCTV footage reveals a disturbing act of animal cruelty on a roadside in Ravet, Pune.
CCTV footage reveals a disturbing act of animal cruelty on a roadside in Ravet, Pune.saam tv
Published On

गोपाल मोटघरे, साम टीव्ही

माणुसकीला काळिमा फासणारी आणि विकृत मानसिकतेचे दर्शन घडवणारी एक धक्कादायक घटना पिंपरी-चिंचवड शहरात समोर आली आहे. एका भटक्या कुत्रीवर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करणाऱ्या ३५ वर्षीय विकृत तरुणाविरुद्ध अखेर रावेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही संपूर्ण संतापजनक घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती.

CCTV footage reveals a disturbing act of animal cruelty on a roadside in Ravet, Pune.
Pune Local Mega Block: पुणेकरांसाठी मोठी बातमी! आज दिवसभर रेल्वेचा मेगाब्लॉक; पुणे- लोणावळा लोकल रद्द; वाचा सविस्तर..

मिळालेल्या माहितीनुसार, १९ मे रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास रावेत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 'खत्री बंधू डेस्टिनेशन कॅफे'जवळील फुटपाथवर एक तरुण अर्धनग्न अवस्थेत फिरत होता. त्यानंतर त्याने फुटपाथवरील एका निष्पाप भटक्या कुत्रीवर अनैसर्गिक अत्याचार केले. हा सर्व प्रकार कॅफेच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आणि या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली.

CCTV footage reveals a disturbing act of animal cruelty on a roadside in Ravet, Pune.
राज्यावर पुन्हा अवकाळीचं संकट! 5 जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता

प्राणी मित्रांच्या तक्रारीनंतर पोलिसांची कारवाई

या क्रूर आणि विकृत घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर शहरातील प्राणी मित्रांनी तात्काळ पावले उचलली. प्राणी मित्रांनी दिलेल्या तक्रारीवरून रावेत पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

CCTV footage reveals a disturbing act of animal cruelty on a roadside in Ravet, Pune.
Politics : दोन पाटलांमध्ये कलगीतुरा, सांगलीत राजकीय राडा; सभापती निवडणुकीआधीच डायलॉग हाणला, इतिहासच काढला

आरोपीचे नाव राजेंद्र रघुनाथ शाहू (वय ३५ वर्षे) असून तो मूळचा ओडिशा राज्याचा आहे. भारतीय न्याय संहिता (BNS) आणि प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम कायद्यानुसार गुन्हा पोलिसांनी नोंदवला आहे. मुक्या प्राण्यांवर होणाऱ्या अशा अत्याचाराच्या घटनांमुळे नागरिकांमधून आणि प्राणीप्रेमींमधून तीव्र संताप व्यक्त होत असून, अशा विकृत मानसिकतेच्या आरोपीला कडक शिक्षा व्हावी, अशी मागणी केली जात आहे. रावेत पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com