

राज्य सरकारच्या वतीने करण्यात आलेल्या तक्रारीच्या आधारे हा गुन्हा दाखल करण्यात आला .
सार्वजनिक रस्त्यावर मोठ्या आवाजात लाऊडस्पीकरचा वापर केल्याचाही आरोप
दुपारी 4 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत हे आंदोलन करण्यात आले.
मुंबईतील शिवाजी पार्क येथे 2 ऑक्टोबर रोजी झालेल्या अनधिकृत आंदोलनाप्रकरणी मुंबई पोलिसांनी सुमारे 500 जणांविरोधात FIR दाखल केला आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी कॉक्रोच जनता पार्टीकडून मुंबईत आंदोलन करण्यात आले. आता पोलिसांकडून कारवाई केली जात असून सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपकेंसह ५०० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.
या FIRमध्ये CJPचे नेते अभिजीत दिपके, अजिंक्य शिंदे, प्रणय अहिरे, आशुतोष रांका आणि सौरभ दास यांच्यासह आफरीन नवाज, सौम्या कोर्डे, अंकित भारद्वाज, विजय मालगी आणि योगेश इंगळे यांचीही नावं आहेत. शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात राज्य सरकारच्या वतीने करण्यात आलेल्या तक्रारीच्या आधारे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणात BNS कलम 189(2) आणि 223, तसेच महाराष्ट्र पोलीस कायद्यातील कलम 37(1), 37(3) आणि 135 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी कॉक्रोच जनता पार्टी आक्रमक भूमिका घेतलीय. कॉक्रोच जनता पार्टीच्या शिवाजी पार्कातील आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. तरीही सीजेपीने आंदोलन केले. या आंदोलनाला अनेक बॉलिवूड सेलिब्रेटींनी पाठिंबा दिला होता. या सीजेपीच्या आंदोलनात देशभरातील तरुण आले होते. या आंदोलनानंतर मोठा गोंधळ बघायला मिळाला. स्थानिक नागरिकांनी सीजेपीच्या आंदोलनाला जोरदार विरोध केला. त्यातच आता अभिजीत दिपके यांच्या अडचणीत वाढ होताना दिसतंय.
आंदोलनाला मोठ्या संख्येने आंदोलक शिवाजी पार्क परिसरात जमा झाले. यावेळी सार्वजनिक सभा घेण्यात आली आणि घोषणाबाजी करण्यात आल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे. तसेच, सार्वजनिक रस्त्यावर मोठ्या आवाजात लाऊडस्पीकरचा वापर केल्याचाही आरोप आंदोलकांवर करण्यात आला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.