

मुंबईतील शिवाजी पार्क येथे CJPकडून 2 ऑक्टोबरला आंदोलन पुकारण्यात आले आहे.
आंदोलनादरम्यान 75 वर्षीय गोपी पिल्लई यांची प्रकृती बिघडल्याची माहिती
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे.
सुरज मसूरकर
दिल्लीनंतर आता महाराष्ट्राच्या राजधानीत कॉक्रोच जनता पार्टीचं (CJP) आंदोलन सुरू आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येत असून या आंदोलनासाठी मोठ्या प्रमाणात तरुणांनी गर्दी केलीय. आज महात्मा गांधींच्या जयंतीदिनीच सीजेपीने मुंबईतील शिवाजी पार्कवर आंदोलन पुकारले आहे. मात्र याचदरम्यान एक धक्कादायक घटना घडलीय. एका आंदोलककर्त्याला हृदयविकाराचा झटका आला असून त्याला सीपीआर देत असल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेत. दरम्यान या आंदोलकाचा मृत्यू झाल्याची माहिती हाती आलीय.
गोपी पिल्लई असं या आंदोलकांचे नाव असून ते ७५ वर्षाचे आहेत. ते केरळवरून सीजीपेच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी आले होते.
अभिनेत्री शर्लिन चोपडाने देखील सीजेपीच्या आंदोलनात सहभागी होत पाठिंबा दर्शवलाय. तर ज्येष्ठ अभिनेते नसरुद्दीन शाह यांनीही सहभागी होत अभिजीत दिपकेचं कौतुक केलंय. कॉक्रोच जनता पक्षाकडून करण्यात येणाऱ्या आंदोलनात तरुणांचा मोठा सहभाग दिसत आहे. महात्मा गांधी यांच्या जयंतीचं औचत्य साधत तर दादर येथील शिवाजी पार्क जवळ CJP कडून आंदोलन केले जात आहे. या आंदोलनाला तरुणाई येऊ लागली आहे.
आंदोलनात सहभागी झालेल्या ज्येष्ठ नागरिकाने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि EVMवर संताप व्यक्त केला. पंतप्रधान मोदींचा प्राण म्हणजे EVM, अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी दिली. निवडणूक प्रक्रियेबाबत आपल्या मनातील प्रश्नही त्यांनी यावेळी मांडले.
पंतप्रधानांना कुठलं कुटुंब नाही, देशाचं वाटोळं करणार"
आंदोलनात सहभागी झालेल्या एका ज्येष्ठ नागरिकाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही टीका केली. पंतप्रधानांना कुठलं कुटुंब नाही, म्हणजे ते देशाचं वाटोळं करणार, असं मत त्यांनी व्यक्त केलं. त्यांच्या या वक्तव्याचीही आंदोलनस्थळी चर्चा झाली.
CJPच्या आंदोलनात मोठ्या संख्येने Gen Z तरुण सहभागी झाले आहेत. त्यांच्यासोबत ज्येष्ठ नागरिकांनीही उपस्थिती लावत निवडणूक प्रक्रियेबाबतच्या आपल्या व्यथा मांडल्या. त्यामुळे शिवाजी पार्कातील आंदोलनात तरुण आणि ज्येष्ठ नागरिकांचा एकत्रित सहभाग पाहायला मिळाला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.