Chourang Punishment : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात महिलांची अब्रू लुटणाऱ्यांना दिली जाणारी 'चौरंग' शिक्षा काय होती?

Know the shivaji maharaj chourang punishment details : छत्रपती शिवाजी महाराज यांनी वयाच्या १६ व्या वर्षी बलात्कार करणाऱ्या नराधमाला चौरंग शिक्षा दिली होती. चौरंग शिक्षा पाहून अशा प्रकारचे भ्याड कृत्य पुन्हा करण्याची हिंमत कुणाची होत नव्हती.
shivaji maharaj chourang punishment know details
Know the shivaji maharaj chourang punishment details
Published On

Chourang Punishment for molestation case : पुरोगामी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांपासून महिला अत्याचाराच्या घटना वाढतच आहे. धक्कादायक म्हणजे, नराधमांनी कोवळ्या, अजाणत्या जिवांनाही सोडले नाही. शाळेत ज्या चिमुकल्या दादा दादा म्हणत होत्या, त्याच नराधमाने त्यांना ओरबडले. बदलापूर घटनेमुळे राज्य हादरले. आंदोलने झाली, सरकारकडून कारवाईचे अश्वासन देण्यात आले. पण राज्यात महिला आणि चिमुकलीच्या इज्जतीसोबत (badlapur school case in marathi) खेळण्याची ही पहिलीच गोष्ट नाही. याआधीही अशा प्रकारची कूकर्म झाली आहेत. कोर्टाकडून गुन्हेगारांना शिक्षा होते, पण त्याला खूप उशीर लागतो. न्यायव्यवस्थेत पळवाटाही आहेत.

2013 मध्ये मुंबईत शक्ती मिलमध्ये सामूहिक बलात्कार (mumbai shakti mills case) झाला होता. त्या आरोपींना पकडलेही, तेव्हाही असाच संताप व्यक्त करण्यात आला होता. ११ वर्षे उलटली, पण त्या आरोपीला अद्याप शिक्षा झालेली नाही. हे काही पहिलेच प्रकरण नाही. याआधीही अशी प्रकरणं झाली आहेत. बदलापूर असो अथवा शक्ती मिल प्रकरण असो. महिला, चिमुकल्यांवरील अत्याचार कायमचे कधी थांबणार?असाच प्रश्न उपस्थित होतोय. आंदोलनं, कँडल मोर्चा काढून काय होणार?

अभिनेता रितेश देशमुख यांनी बदलापूर प्रकरणावर संताप व्यक्त करत असताना महत्वाचा मुद्दा उपस्थित केला. राक्षसी कृत्य करणाऱ्यांना कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे. त्यासाठी रितेश देशमुख यानं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चौरंग शिक्षेचा (shivaji maharaj chourang punishment) दाखला दिला. छत्रपती शिवाजी महाराज (Chhatripati Shivaji Maharaj Maratha Empire) यांनी वयाच्या १६ व्या वर्षी बलात्कार करणाऱ्या नराधमाला चौरंग शिक्षा दिली होती. चौरंग शिक्षा पाहून अशा प्रकारचे भ्याड कृत्य पुन्हा करण्याची हिंमत कुणाची होत नव्हती. छत्रपती शिवाजी महाराज यांची चौरंग शिक्षा नेमकी काय होती. याबाबत जाणून घेण्यासाठी इतिहासतज्ज्ञ इंद्रजीत सावंत यांच्यासोबत आम्ही चर्चा केली. इंद्रजीत सावंत यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चौरंग शिक्षेविषयी आणि त्यांनी कुणाकुणाला शिक्षा दिली, त्याबाबत सांगितले.

shivaji maharaj chourang punishment know details
Riteish Deshmukh : बदलापूर प्रकरणावर रितेश देशमुख चिडला, संतापला; शिवरायांनी दिलेल्या शिक्षेचा दिला दाखला!

छत्रपती शिवाजी महाराज (Chhatripati Shivaji Maharaj Maratha Empire) यांनी आदर्श शासनव्यवस्थेची घडी बसवताना रयतेच्या हिताला नेहमीच प्राधान्य दिले. त्यांनी महिलांचा सन्मान केला. स्वराज्यातील स्त्रियांच्या ते पाठीशी राहिलेच. पण शत्रूंच्या स्त्रियांचाही त्यांनी योग्य तो आदर ठेवला, त्यांना सन्मानाने वागवले. छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्त्रियांवर अत्याचार करणाऱ्यांची कधीच गय केली नाही. त्यांनी स्वत:च्या मेहुण्यालाही शिक्षा दिली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्यातील चौरंग शिक्षेचा धाक होता. राजेंनी नराधमांना धाक बसवण्यासाठी दिलेली चौरंग शिक्षा काय होती, ती पाहूयात...

चौरंग शिक्षा नेमकी काय आहे ? shivaji maharaj chourang punishment know details

वयाच्या १६ व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराज यांनी बलात्कार करणाऱ्याला चौरंग शिक्षा दिली होती. रांझ्याच्या बाबाजी भिकाजी गुजर याने केलेल्या बलात्काराच्या गुन्ह्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याचे हात कोपरापासून आणि पाय गुडघ्यापासून कलम करण्याची शिक्षा दिली होती. छत्रपती शिवाजी महाराज देत असलेल्या याच शिक्षेला 'चौरंग' शिक्षा असे म्हटले जाते. हात-पाय कलम केल्यानंतर रक्तस्त्राव होऊन ती व्यक्ती दगावू नये यासाठी जखमा गरम तेलात अथवा तुपात तळल्या जायच्या. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चौरंग शिक्षेचा धाक इतका होता की, अशा प्रकारचे कृत्य पुन्हा करण्याची हिंमत होत नव्हती. गैरकृत्याला माफी नाही मग तो कोणीही असो याची जान सर्वांना यावी यासाठी महाराजांनी ही कठोर अशी चौरंग शिक्षा दिली.

इंद्रजीत सावंत सांगतात... हात-पाय कलम केल्यानंतर जखम तेलात तळल्या जायच्या. त्यामुळे नसा बंद व्हायच्या.. त्यामुळे रक्तस्त्राव तर थांबायचाच, पण तो व्यक्ती मरत नसायचा. शिक्षा फक्त हात-पाय तोडायची द्यायची. त्याला मृत्यूदंड द्यायचा नाही. आयुष्यभर हे सर्वांसमोर उदाहरण म्हणून राहील. तुम्ही जर महिलांवर अत्याचार केला, तर तुम्हालाही अशीच शिक्षा होईल, असे सर्वांसमोर उदाहरण राहावे म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांनी चौरंग शिक्षा सुरु केली होती. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्यात चौरंग शिक्षेचा धाक होता. त्यामुळे महिलांकडे कुणीही वाकड्या नजरेनं पाहत नसायचे.

shivaji maharaj chourang punishment know details
Explainer: कोणत्या देशात घडतात सर्वाधिक लैंगिक अत्याचाराच्या घटना?, भारताचा कितवा क्रमांक लागतो? वाचा सविस्तर

इंद्रजीत सावंत सांगतात, बाबाजी भिकाजी गुजर हे फक्त एकच प्रकरण नाही, त्याशिवाय खंडोजी कोपर यांचा एक पाय आणि एक हात तोडला होता. इतकेच काय तर छत्रपती शिवाजी महाराज यांनी महिलांवर अत्याचार करणाऱ्या आपल्या मेहुण्यालाही सोडलं नव्हते. त्यांनी मेहुण्याला डोळे काढण्याची शिक्षा दिली होती. त्यानंतर त्याला आयुष्यभर तुरुंगात डांबले होते.

छत्रपतींनी मेहुण्यालाही सोडलं नाही -

इंद्रजीत सावंत सांगतात... मल्लवा देसाईचं एक प्रकरण आहे. धारवाडजवळ बेलवडी जिंकण्यासाठी त्यांचा मेहुणा सखुजी गायकवाड यांच्यावर शिवाजी महाराज यांनी जबाबदारी दिली होती. पती मृत्यू पावल्यानंतर मल्लवा यांनी लढाई सुरुच ठेवली होती. त्यांनी पुरुष वेशाधारी स्त्री सैन्यही मैदानात उतरवले होते. महाराज मैदानात उतरल्यानंतर बेलवडीच्या सैन्यानी माघार घेतली. सुखोजी गायकवाड याने काही सैन्यास कैद करुन रात्रभर मराठा छावणीत ठेवले होते. त्यामध्ये मल्लवा यांचाही समावेश होता. सखुजी यांनी मल्लवा यांच्यावर वाईट नजर ठेवली.. हे छत्रपती शिवाजी महाराज यांना समजले.

छत्रपतींच्या राज्यात शिरसत्याप्रमाणे स्त्रियांना मराठा सैनिकांनी पकडणे हा मोठा गुन्हा मानले जायचे. हा गुन्हा करणारा छत्रपतींचा मेहुणा होता. महाराजांनी त्यांनाही सोडले नाही. सुखोजी गायकवाड यांचे डोळे काढण्याची शिक्षा दिली. महाराजांनी मल्लवा यांना छत्रपती शिवाजी महाराज यांनी सावित्रीचा खिताब देऊन गौरव केला. त्याशिवाय तिचं राज्य तिला परत दिले. तिच्या मुलाला मांडीवर घेऊन राजेंनी दूध पाजले. मल्लवा यांना राजेंनी बहीण मानले. मल्लवा यांनी छत्रपतींचा पुतळा तयार केला. ते शिल्प आजही आहे.

बदलापूरमधील घटना सुन्न करणारी आहे. या घटनेमुळे महिला, मुली राज्यात सुरक्षित आहेत का? असा सवाल उपस्थित होतोय. कारण, राज्यात वारंवार अशा घटना घडत आहेत, त्याचं प्रमाण वाढतच चाललेय. आरोपींना कायद्याचा धाक राहिलेला नाही का? असा सवाल उपस्थित होत आहे. आशा गुन्हेगारांना महाराजांच्या काळातील शिक्षा दिल्या गेल्या पाहिजेत का? असा विचार सामान्यांच्या मनात आला तर त्याला चुकीचे ठरवायला नको.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com