Explainer: कोणत्या देशात घडतात सर्वाधिक लैंगिक अत्याचाराच्या घटना?, भारताचा कितवा क्रमांक लागतो? वाचा सविस्तर

Women Crime Rate In India compared to other countires: महिलांवरील लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये पहिल्या पाच देशांमध्ये भारताचा पहिला क्रमाक लागतो. 2020 मध्ये बलात्काराच्या घटनांमध्ये अमेरिका आणि दक्षिण आफ्रिकेनंतर भारताचा तिसरा क्रमांक होता.
Explainer
ExplainerSaam Digital
Published On

कोलकता, राजस्थान आणि महाराष्ट्रात घडलेल्या लैगिंक अत्याचाराच्या घटनांमुळे संपूर्ण देश हादरून गेला आहे. डॉक्टरपासून ते अगदी ४ वर्षांच्या चिमुकल्यांवर अत्याचाराच्या घटना घडल्या आहेत. महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून कायद्यात सुधारणा आणि कारवाईचं आश्वासन देऊनही अत्याचाराच्या घटना कमी होताना दिसत नाहीत. त्यामुळे संतापाची लाट पसली असून याच्या निषेधार्थ देशभरातील महिला रस्त्यावर उतरल्या आहेत.

Explainer
Ajmer 1992 Case : नग्न फोटो काढून केलं जायचं ब्लॅकमेल, १०० हून अधिक मुलींवर अत्याचार; 6 जणांना जन्मठेप, कसं उलगडलं प्रकरणं?

जगात सर्वाधित अत्याचार महिलांवर होतात. त्यात भारतातील आकडा लक्षणीय आहे. २०१२ मध्ये दिल्लीत घडलेल्या निर्भया घटनेनंतर भारतातील महिलांवरील कायद्यात अमूलाग्र बदल करण्यात आले आहेत. भारतामध्ये बलात्कार आणि लैंगिक अत्याचाराच्या घटनांची संख्या चिंताजनक आहे. शिक्षणाचं प्रमाण कमी असल्यामुळे अत्याचारांच्या घटनांची पोलीस स्थानकात नोंद होण्याचं प्रमाण कमी आहे. त्यामुळे भारतासारख्या देशात याचा आकडा निश्चित सांगता येणं कठीण आहे. दरम्यान राष्ट्रीय गुन्हे अन्वेषण ब्युरो (NCRB) च्या 2020 च्या आकडेवारीनुसार भारतात वर्षाला सुमारे ३०,000 बलात्काराच्या घटना नोंदवल्या गेल्या आहेत. हे आकडे प्रत्येक वर्षी कमी-अधिक प्रमाणात बदलत असतात.

भारतात 2016 मध्ये 39,000 अत्याचाराच्या घटनांची नोंद झाली होती. एका सरकारी अहवालानुसार 2018 मध्ये देशभरात दर 15 मिनिटांला एका महिलेवर अत्याचार झाल्याच्या घटना नोंद झाल्या होत्या. 2022 मध्ये 31,000 हून अधिक बलात्काराच्या घटना घडल्या होत्या. २०१२ नंतर अशा घटनांमध्ये न्यायालयाने शिक्षेत वाढ केली असली तरी या घटनांमधील दोषींना १० वर्षांची शिक्षा किंवा आजीवन कारावासाच्या शिक्षेची दरतूद आहे. तर पीडित १२ वर्षांपेक्षा लहान असेल तर फाशीच्या शिक्षेची तरतूद आहे.सरकारने कायदा बदलून लैंगिक छळ सारख्या कृत्यांचा समावेश बलात्कार म्हणून केला आहे, बलात्काराची प्रकरणे त्वरीत हाताळण्यासाठी विशेष न्यायालये निर्माण केली आहेत. एखाद्या व्यक्तीवर प्रौढ म्हणून खटला चालवण्याचे वय देखील कमी केलं आहे. मात्र या घटनांमध्ये शिक्षा होण्याचं प्राण देखील खूपच कमी आहे.

अत्याचारात भारताचा कितवा क्रमांक?

महिलांवरील अत्याचारांच्या घटनांचा जागतिक पातळीवर विचार केला तर, बलात्काराच्या घटनांची नोंद असलेल्या पहिल्या १० देशांमध्ये भारताचा क्रमांक पहिल्या पाचमध्ये कायम राहिला आहे. 2020 मध्ये बलात्काराच्या घटनांमध्ये अमेरिका आणि दक्षिण आफ्रिकेनंतर भारताचा तिसरा क्रमांक होता. यानंतर अमेरिकेत दरवर्षी सर्वाधिक बलात्काराच्या घटनांची नोंद केली गेली आहे.

Explainer
Supreme Court: देशातील डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी सर्वोच्च पाऊल! नॅशनल टास्क फोर्सची स्थापना; समितीमध्ये कोणाकोणाचा समावेश? वाचा..

लैंगिक अत्याचारामागील मानसिक आणि सामाजिक कारणं

मानसिक कारणे

अधिकार गाजवण्याची भावना: यामागे पुरुषी मानसिकता अनेकदा जबाबदार असते. महिलांना कमी समजणे. त्यांच्यावर अधिकार गाजवणे, या प्रवृत्तींमधून बलात्काराच्या घटना घडत असतात, अस सामाजिक कार्यकर्त्यांचं मत आहे.

अपायुक्त मानसिक आरोग्य: मानसिक आजार किंवा अस्थिर मानसिक आरोग्यामुळे काही व्यक्ती हिंसात्मक वर्तन करत असतात. मानसिक विकार, विशेषत: सायकोपॅथी, सोशियोपॅथी, किंवा इतर गंभीर मानसिक विकार बलात्कारार किंवा लैंगिक अत्याचाराला कारणीभूत ठरू शकतात.

सामाजिक कारणे

लिंगभेद आणि पितृसत्ता: समजते आणि त्यांचे शोषण करण्याची परवानगी देते. महिलांना केवळ भोग वस्तू किंवा संपत्ती म्हणून पाहिलं जातं. अनादिकाळापासून ही एक दुय्यम दर्जाची परंपरा राहिली आहे.

शिक्षणाचा अभाव आणि लैंगिक शिक्षण: योग्य लैंगिक शिक्षणाचा अभाव, उच्च शिक्षणाचा अभाव, लैंगिक समज कमी असणे बलात्कार आणि लैंगिक अत्याचाराच्या घटनांना कारणीभूत ठरतात.

संस्कृती आणि सामाजिक शिष्टाचार: काही समाजांमध्ये महिलांच्या स्वातंत्र्याला मान्यता नसते आणि त्यांच्यावर अन्याय सहन करण्याची अपेक्षा केली जाते. अशा संस्कृतीत बलात्काराच्या घटनांना कमी महत्त्व दिलं जातं.

बेरोजगारी आणि गरिबी: आर्थिक संकट आणि बेरोजगारीसारख्या समस्यांमुळे काही व्यक्ती मानसिक आघात आणि निराशेने ग्रस्त होतात, ज्यामुळे त्यांचा हिंसक वर्तनाकडे कल वाढतो.

पोलीस आणि न्यायव्यवस्थेतील अपयश: अनेकदा बलात्काराच्या घटनांमध्ये पोलिसांची निष्क्रियता आणि न्यायव्यवस्थेतील विलंबामुळे पीडितांना न्याय मिळत नाही. यामुळे गुन्हेगारांना प्रोत्साहन मिळते.

उपाययोजना

शिक्षण आणि जागृती: लैंगिक शिक्षण आणि लैंगिक समानतेच्या मूल्यांची शिकवण देणारी शिक्षणव्यवस्था विकसित करणे आवश्यक आहे. यामुळे लोकांच्या विचारसरणीत बदल होईल.

कडक कायदे आणि त्वरित शिक्षा: बलात्कार आणि लैंगिक अत्याचारांसाठी कठोर शिक्षा निश्चित करणे आणि न्यायप्रणालीची प्रक्रिया वेगवान करणे गरजेचे आहे.

महिलांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना: महिलांच्या सुरक्षिततेसाठी अधिकाधिक उपायोजना आणि त्यांचे हक्क अबाधित राहतील याची काळजी घेणे.

समाजातील पितृसत्ताक विचारसरणीला आव्हान: पितृसत्ताक विचारसरणीचे उच्चाटन करण्यासाठी समाजातील विचारांमध्ये बदल घडवून आणणे आणि महिलांचे हक्क अधिकार यांचा प्रचार करणे गरजेचे आहे.

बलात्कार आणि लैंगिक अत्याचाराचे प्रश्न केवळ महिलांसाठीच नव्हे तर संपूर्ण समाजासाठी गंभीर आहेत. त्यामुळे, या समस्या सोडवण्यासाठी सर्व स्तरांवर प्रयत्न करणे आवश्यक आहे. समाजातील मानसिकता बदलणे, कठोर कायदे लागू करणे, पीडितांना न्याय मिळवून देण्याची गरज आहे.

Explainer
Crime News : पुण्यात खळबळ; क्रीडा शिक्षकाकडून ४ अल्पवयीन मुलींचा विनयभंग

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com