Pune Crime News : पुण्यातून खळबळजनक वृत्त समोर आलं आहे. पुण्यात ४ अल्पवयीन मुलींचा विनयभंग झाल्याची घटना घडली आहे. क्रीडा शिक्षकाने हा लज्जास्पद प्रकार केल्याचे समोर आला आहे. या घटनेनंतर शिक्षकाच्या विरोधात संताप व्यक्त करत कठोर कारवाईची मागणी केली जात आहे. (Latest Marathi News)
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील (Pune) शाळेत अल्पवयीन विद्यार्थिनींवर शाळेतील क्रीडा शिक्षकाकडूनच विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेने आरोपी शिक्षकावर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे. तर अविनाश गोविंद चिलवेरी (२३) असे विनयभंग केलेल्या शिक्षकाचे नाव आहे.
आरोपी शिक्षकाला (Teacher) पोलिसांनी अटक केली आहे. पुण्यातील महानगर पालिकेच्या शाळेतील धक्कादायक घटना समोर आली आहे. सगळा प्रकार नोव्हेंबर २०२२ पासून सुरू होता. शाळेमध्ये घेतलेल्या 'गुड टच बॅड टच' या उपक्रमामुळे हा सगळा प्रकार उघडकीस आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढवा पोलिस ठाण्याच्या हद्दीत आरोपी एका प्राथमिक शाळेत क्रीडा शिक्षक म्हणून नोकरीस होता. मागील २ महिन्यांपासून त्याने शाळेतील ४ ते ५ विद्यार्थिनींना मोबाईल वरून मेसेज पाठवायचा. तसेच त्यांच्याशी जवळीक साधून त्यांचे चुंबन घेऊन त्यांना मिठी मारायचा. काही दिवसांपूर्वी, शाळेत विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी 'गुड टच बॅड टच' हा उपक्रम एका स्वयंसेवी संघटनेने राबवला होता.
मुलींना चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्श याबद्दल सांगण्यात आल्यानंतर विनयभंग झालेल्या विद्यार्थिनींनी हा संपूर्ण प्रकार समोर आणला. हा सगळा प्रकार पोलिसांना कळताच त्यांनी शिक्षकाला गुन्हा दाखल करून अटक केली.
या संपूर्ण प्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात भारतीय दंडात्मक कलम ३५४ (अ) तसेच पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून आधिक तपास सुरू आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.