Badlapur School Minor Students Molestation Case : बदालपूरमधील शाळेत दोन चिमुकल्यावर झालेल्या अत्याचार प्रकरणावर राज्यात संतापाची लाट आहे. रागावलेले बदलापूरकर रस्त्यावर (badlapur news today) उतरुन आंदोलन करत आहेत. ९ तासांपासून संतप्त जमाव आंदोलन करत आहेत. रेल्वेसेवा विस्कळीत झाली आहे. अजाणत्या वयातच मुली नराधमाच्या शिकार झाल्या, याप्रकरणावर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. मराठी अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) यानेही याप्रकरणावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. त्या राक्षसाला कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे, असे देशमुख म्हणाला आहे. त्याशिवाय छत्रपती शिवाजी महाराज आशा गुन्हेगारांना देत असलेल्या शिक्षेचा दाखलाही यावेळी त्याने दिलाय.
बदलापूरच्या घटनेमुळे (badlapur protest) रितेश देशमुख संतापला आहे. रितेशने ट्वीट करत आपला संताप व्यक्त केलाय. त्यांने आपल्या ट्वीटमध्ये म्हटलेय की, "एक पालक म्हणून मी पूर्णपणे वैतागलो आहे. दुखी आहे.. याचा प्रचंड राग येतोय. दोन चार वर्षांच्या मुलींवर शाळेतील पुरुष सफाई कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केले. शाळा ही मुलांसाठी त्यांच्या स्वतःच्या घरा इतकीच सुरक्षित जागा असायला हवी. या राक्षसाला कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या काळात दोषींना चौरंग शिक्षा द्यायचे, हाच कायदा पुन्हा कृतीत आणण्याची गरज आहे."
स्त्रियांचा अवमान कुठल्याही प्रकारे खपवून घेतला नाही, असे शिवाजी महाराजांनी स्पष्ट केले होते. छत्रपती शिवाजी महाराज यांनी वयाच्या १६ व्या वर्षी बलात्कार करणाऱ्याला चौरंग शिक्षा दिली होती. रांझ्याच्या भिकाजी पाटील याने केलेल्या बलात्काराच्या गुन्ह्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याचे हात पाय कलम करण्याची शिक्षा दिली होती. याच शिक्षेला 'चौरंग करणे' असे म्हटले जाते. हात पाय कलम केल्यानंतर रक्तस्त्राव होउन दगावू नये यासाठी जखमा गरम तुपात बूडवल्या गेल्या. गैरकृत्याला माफी नाही मग तो कोणीही असो याची जान सर्वांना यावी यासाठी महाराजांनी ही चौरंग शिक्षा अशी कठोर शिक्षा दिली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चौरंग शिक्षेचा धाक इतका होता की, आशाप्रकारचे कृत्य पुन्हा करण्याची हिंमत कुणीच केली नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.