कल्याणमध्ये शिवसेना आणि भाजपचे अखेर सूत जुळलं; पालिकेच्या तिजोरीच्या चाव्या कुणाला मिळाल्या?

ShivSena BJP Alliance In Kalyan Dombivli Municipal Corporation: कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत शिवसेना शिंदे गट आणि भाजप यांच्यात अखेर समझोता झाला असून स्थायी समितीसह महत्त्वाच्या समित्यांची पदे बिनविरोध ठरली आहेत.
Shiv Sena and BJP leaders during the nomination process for key KDMC committee chairperson posts in Kalyan.
Shiv Sena and BJP leaders during the nomination process for key KDMC committee chairperson posts in Kalyan.Saam Tv
Published On

संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही

कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या तीनही महत्वाच्या समितीच्या सभापती पदासाठी शिवसेना शिंदे गट आणि भाजपचे अखेर सूत जुळल्याने निवडणुकीच्या लढतीतील चुरस संपुष्टात आली. पालिकेच्या अर्थिक तिजोरीची चावी असलेली स्थायी समिती सभापती पदासह महिला व बालकल्याण समिती सभापती पद शिवसेना शिंदे गटाने काबीज केले. तर शिक्षण समिती सभापती पद भाजपच्या वाट्याला आले. शिंदे गटाचे मल्लेश शेट्टी यांची स्थायी समिती सभापती पदी तर महिला व बाल कल्याण समिती सभापती पदी सारिका जाधव यांची तर शिक्षण समिती सभापती पदी भाजपाचे अभिजित थरवळ यांची बिनविरोध निवड झाली असून सोमवारी केवळ औपचारिक घोषणा होण्याची बाकी आहे.

Shiv Sena and BJP leaders during the nomination process for key KDMC committee chairperson posts in Kalyan.
Jalna: अवकाळी पावसाचा हाहाकार, अंगावर वीज कोसळून २ तरुणांचा मृत्यू

महापालिकेची निवडणूक पार पडल्यावर भाजपने महापौर पदी शिंदेसेनेच्या हर्षाली चौधरी या विराजमान झाल्या. उपमहापौर पदी राहूल दामले हे विराजमान झाले. महापौर पद शिंदेसेनेला आणि उपमहापौर पद भाजपला मिळाले. महापौर पदाचे आरक्षण अनुसूचित जमातीच्या उमेदवाराकरीता असल्याने शिंदेसेनेकडे उमेदवार होता. तर भाजपकडे या प्रवर्गातील उमेदवार नव्हता. त्यानंतर महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या कोणाच्या हाती असतील याकडे सगळयांचे लक्ष लागले होते.

Shiv Sena and BJP leaders during the nomination process for key KDMC committee chairperson posts in Kalyan.
Mumbai Crime: मुंबईत रक्तरंजित थरार! ३ जणांवर तलवारीने सपासप वार, NCP नेत्याच्या पुतण्याला अटक

स्थायी समिती सभापती पदावर भाजपने दावा ठोकला होता. पालिकेच्या महत्वाच्या समित्या असलेल्या स्थायी समिती सभापती, महिला व बाल कल्याण समिती सभापती आणि शिक्षण समिती सभापती पदाच्या निवडणुकीसाठी गुरुवारी नामांकन अर्ज दाखल करण्याच्या दिवशी शिवसेना शिंदे गट व भाजप महायुती पक्षाने सामोपचाराने शिवसेना शिंदे गटाला स्थायी समिती आणि महिला व बाल कल्याण समिती सभापती पद तर भाजपला शिक्षण समिती सभापती पद देण्याचा निर्णय घेतल्याने अखेरीस भाजपला शिक्षण समिती सभापती पदावर समाधान मानावे लागले आहे.

Shiv Sena and BJP leaders during the nomination process for key KDMC committee chairperson posts in Kalyan.
Ashok Kharat Case: भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी अपडेट, दीपक केसरकरांच्या निकटवर्तीयाची SIT चौकशी

शिक्षण समिती सभापती पदासाठी भाजपचे नगरसेवक अभिजीत थरवळ यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. स्थायी समिती सभापती पदासाठी शिवसेना शिंदे गटाचे मल्लेश शेट्टी यांनी तर महिला बाल कल्याण समिती सभापती पदी पदासाठी शिंदे सेनेच्या सारीका जाधव यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे शिंदेसेनेच्या हाती महत्वाची असलेली स्थायी समिती आणि महिला बाल कल्याण समिती आली आहे.

Shiv Sena and BJP leaders during the nomination process for key KDMC committee chairperson posts in Kalyan.
Dombivli : डोंबिवली हादरले! ३ रिक्षा चालकाने महिलेवर केला सामूहिक बलात्कार

प्रत्येक समितीसाठी प्रत्येकी एकच उमेदवारी अर्ज सचिव किशोर शेळके यांच्याकडे प्राप्त झाल्याने तीनही समितीच्या सभापती पदाच्या निवड बिनविरोध होणार आहे. त्याची अधिकृत घोषणा येत्या सोमवारी केली जाणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करताना शिंदे सेनेचे जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे, आमदार राजेश मोरे, महापौर हर्षाली थवील, उपमहापौर राहूल दामले, शिंदेसेनेचे गटनेते विश्वनाथ राणे, भाजपचे गटनेते शशिकांत कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते. शिवसेना शिंदे गटाचे ज्येष्ठ नगरसेवक मल्लेश शेट्टी यांनी यापूर्वीही दोन वेळा स्थायी समिती सभापती पद भूषविले आहे. त्यांना शिंदे सेनेने पुन्हा संधी दिली आहे. नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाईल अशी चर्चा होती. मात्र या चर्चेला पक्षाने पूर्ण विराम दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com