

जालन्यात वीज कोसळून दोन तरुणांचा मृत्यू
अंबड तालुक्यातील महाकाळा गावात घटना
एक तरुण गंभीर जखमी झाला
या घटनेमुळे जालन्यात हळहळ व्यक्त केली जात आहे
राज्यभर अवकाळी पावसाचा हाहाकार सुरू आहे. अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार तर काही ठिकाणी गारांचा पाऊस पडत आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाला आहे. अवकाळी पावसादरम्यान काही ठिकाणी वीज कोसळल्याच्या घटना घडल्या. जालनामध्ये अंगावर वीज कोसळून दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला तर एक तरुम गंभीर जखमी झाला. ही घटना अंबड तालुक्यात घडली. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जालना जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडत आहे. जालन्यातील महाकाळा येथील दोन तरुणांचा अंगावर वीज कोसळून मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी आहे. गोविंद प्रल्हाद लहाने आणि महादेव दगडू बेद्रे असं मृत्यू झालेल्या तरुणांची नावे आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे महाकाळा गावावर शोककळा पसरली आहे.
हे तीन पाऊस सुरू असताना महाकाळा ते साष्ट पिंपळगाव रोडवरील नाथनगर वस्ती येथे लिंबाच्या झाडाखाली थांबले होते. पाऊस पडत असताना अचानक लिंबाच्या झाडावर वीज कोसळली. या घटनेत दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. तर गंभीर जखमी झालेल्या एका तरुणाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या तरुणाची प्रकृती गंभीर आहे.
दरम्यान, सातारा जिल्ह्यातील सातारा, वाई, खंडाळा, कोरेगाव आणि जावळी तालुक्याला अवकाळी पावसाने झोडपून काढले. यावेळी वीज पडून खंडाळा तालुक्यात ९ तर वाई तालुक्यातील १५ शेळ्यांचा मृत्यू झाला. या सर्व भागात आज सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह आणि गारांसह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. साधारण अर्धा तास पडलेल्या पावसामुळे मोठे नुकसान झाले. या पावसामुळे शेतपिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.