Rain Alert : पुढचे ५ दिवस राज्यासाठी महत्वाचे, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता; 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट

Maharashtra Weather News : महाराष्ट्रात पुढील काही दिवस विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता असून हवामान खात्याने येलो अलर्ट जारी केला आहे. गारपिटीचाही इशारा देण्यात आला आहे.
Rain Alert : पुढचे ५ दिवस राज्यासाठी महत्वाचे, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता; 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट
Maharashtra Weather NewsSaam Tv
Published On
Summary
  • राज्यात पुढील काही दिवस वादळी पावसाची शक्यता

  • अनेक जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट जारी

  • तापमान ४० अंशांपेक्षा अधिक नोंद

  • गारपिटीचा इशारा

Maharashtra Today Weather राज्यात पुढील काही दिवस विजांच्या कडकडाटासह पाऊस पडणार असून येत्या काही दिवसांत तो वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच काही जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा ४० अंश पार गेला आहे. आज दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असल्याने हवामान खात्याने येलो अलर्ट दिला आहे. तसेच तुरळक ठिकाणी गारपिटीसाठी पोषक वातावरण होत असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, उद्या म्हणजे ३० मार्च पासून महाराष्ट्रात ढगाळ हवामान आणि दुपारनंतर वादळी पावसाची शक्यता आहे. आज कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पूर्व विदर्भातील सांगली, सोलापूर, धाराशिव आणि लातूर या जिल्ह्यांत विजांसह वादळी पावसाचा अंदाज असल्याने हवामान विभागाने येलो अलर्ट दिला आहे. कोल्हापूर आणि नांदेड येथे विजांसह पावसाला पोषक हवामान तयार झाले आहे.

Rain Alert : पुढचे ५ दिवस राज्यासाठी महत्वाचे, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता; 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट
Shocking : मोलकरणीकडं शरीरसुखाची मागणी, नकार दिल्यानं निर्घृण हत्या; प्रसिद्ध अभिनेत्याला अटक

उद्यापासून पुढील काही दिवस खान्देश , मराठवाडा, पश्चिम विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरातील जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस आणि गारपीट होणार असल्याची माहिती IMD ने दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सतर्कतेचं आवाहन करण्यात आलं आहे.

Rain Alert : पुढचे ५ दिवस राज्यासाठी महत्वाचे, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता; 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचं इंटरनॅशनल कनेक्शन; परदेशात पैसा पाठवण्यासाठी हवाल्याचा वापर?

काल म्हणजेच शनिवारी अमरावती येथे ४१.२ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. तर अकोला आणि वर्धा येथे ४१ अंशापेक्षा अधिक तापमान नोंदले गेले. ‎ब्रह्मपुरी, ‎चंद्रपूर, ‎नागपूर, ‎सोलापूर, ‎‎धुळे, वाशीम येथे ४० अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली. निफाड येथे १४.६ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com