Shocking : मोलकरणीकडं शरीरसुखाची मागणी, नकार दिल्यानं निर्घृण हत्या; प्रसिद्ध अभिनेत्याला अटक

Mumbai Mira Road Actor Ashish Meshram News : मीरारोडमध्ये टीव्ही अभिनेत्याकडून मोलकरणीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपीला पोलिसांनी विशाखापट्टणममधून अटक केली आहे.
Shocking : मोलकरणीकडं शरीरसुखाची मागणी, नकार दिल्यानं निर्घृण हत्या; प्रसिद्ध अभिनेत्याला अटक
Mumbai Mira Road Actor Ashish Meshram NewsSaam Tv
Published On
Summary
  • मीरारोडमध्ये मोलकरणीची निर्घृण हत्या

  • आरोपी टीव्ही अभिनेता अटकेत

  • लैंगिक छळानंतर हत्या केल्याचा आरोप

  • विशाखापट्टणममधून पोलिसांनी केली अटक

  • घटनेने मनोरंजन क्षेत्रात खळबळ

मनोरंजन सृष्टीतून धक्कादायक बातमी समोर आली आहे. मीरारोडमध्ये एका टीव्ही अभिनेत्याने आपल्या घरी काम करणाऱ्या एका मोलकरणीची निर्घृण हत्या केली. धक्कादायक म्हणजे या अभिनेत्याने मोलकरणीकडे शरीर सुखाची मागणी केली होती. या हत्येनंतर घटनास्थळावरुन आरोपीने पळ काढला. मात्र पोलिसांनी त्याला विशाखापट्टणम येथून ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत महिला मुंबईतील काशीमिरा भागात वास्तव्यास होती. सिल्वर पार्क येथील चंद्रेश आर्केड इमारतीत काही दिवसांपासून घरकाम करत होती. बुधवारी सायंकाळी घरकाम करत असलेल्या घराच्या दरवाजात महिला गंभीर जखमी अवस्थेत शेजारी राहणाऱ्या महिलेला दिसली. त्यानंतर महिलेला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. मात्र उपचारापूर्वी तिचा मृत्यू झाला असल्याचे समोर आले.

Shocking : मोलकरणीकडं शरीरसुखाची मागणी, नकार दिल्यानं निर्घृण हत्या; प्रसिद्ध अभिनेत्याला अटक
IAS Bhushan Gagrani : IAS भूषण गगराणी निवृत्त होणार; आता BMC आयुक्तपदी कुणाची नियुक्ती? ७ बड्या अधिकाऱ्यांच्या नावांची चर्चा

शवविच्छेदनात महिलेच्या गळ्यावर, छातीवर आणि पोटावर चाकूने वार केल्याचं आढळून आलं. घटनेनंतर आरोपीने पळ काढला. महिला ज्या घरात काम करत होती, ते घर टीव्ही अभेनेता आशिष मेश्राम असे आहे. याप्रकरणी माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी अभिनेता सोसायटीमध्ये शिरताना आणि तिथून बाहेर पडताना अत्यंत घाईत असल्याचे दिसून आलं. दरम्यान पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे माग काढत त्याला विशाखापट्टणम येथून अटक केल्याचा समोर आलं आहे.

Shocking : मोलकरणीकडं शरीरसुखाची मागणी, नकार दिल्यानं निर्घृण हत्या; प्रसिद्ध अभिनेत्याला अटक
Mumbai : बॉयफ्रेंडने मैत्रिणीच्या केसांची स्तुती केली, संतापलेल्या गर्लफ्रेंडने कैची घेतली अन्...; मुंबईतील धक्कादायक प्रकार

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या अनेक दिवसांपासून अभिनेता आशिष महिलेकडे लैंगिक सुखाची मागणी करत होता. महिलेने वारंवार या मागणीला नकार दिला त्या नंतरही आरोपीने वारंवार तिचा छळ केला.

Shocking : मोलकरणीकडं शरीरसुखाची मागणी, नकार दिल्यानं निर्घृण हत्या; प्रसिद्ध अभिनेत्याला अटक
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचं इंटरनॅशनल कनेक्शन; परदेशात पैसा पाठवण्यासाठी हवाल्याचा वापर?

जानेवारी महिन्यात आरोपीने मृत महिलेच्या मुलाला फोन करून धमकी दिलेली. 'तुझ्या आईने माझ्याकडे काम करणं बंद केलं किंवा माझ्या मागण्या मान्य केला नाही तर तिला जीवे मारीन ' अशी धमकी दिल्यानंतर महिलेच्या मुलाने आशिषला गाठून मारण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, आशिषच्या मोठ्या भावाने महिलेला विश्वासात घेऊन 'आशिष आता फ्लॅटवर राहत नाही', असे सांगितले. पुन्हा एकदा महिलेने विश्वास ठेवून त्या घरात कामाला जाण्यास सुरुवात केली होती. कामावर आल्याचे पाहून आरोपीने घरात प्रवेश केला आणि महिलेची हत्या केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com