IAS Bhushan Gagrani : IAS भूषण गगराणी निवृत्त होणार; आता BMC आयुक्तपदी कुणाची नियुक्ती? ७ बड्या अधिकाऱ्यांच्या नावांची चर्चा

Mumbai Municipal Corporation IAS Bhushan Gagrani : मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी ३१ मार्च रोजी निवृत्त होणार असून त्यांना मुदतवाढ मिळणार नाही. त्यांच्या जागी नवीन आयुक्त कोण होणार याबाबत ७ वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावे चर्चेत आहेत.
IAS Bhushan Gagrani : IAS भूषण गगराणी निवृत्त होणार; आता BMC आयुक्तपदी कुणाची नियुक्ती? ७ बड्या अधिकाऱ्यांच्या नावांची चर्चा
Mumbai Municipal Corporation IAS Bhushan GagraniSaam Tv
Published On
Summary
  • भूषण गगराणी ३१ मार्चला निवृत्त

  • मुदतवाढ मिळण्याची शक्यता संपली

  • ७ वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांची नावे चर्चेत

  • मुंबई पालिकेत मोठा प्रशासकीय बदल

  • नवीन आयुक्ताची घोषणा लवकरच अपेक्षित

मुंबई महापालिकेतून मोठी बातमी समोर आली आहे. महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी ३१ मार्च रोजी निवृत्त होणार आहेत. त्यांना ३ महिन्यांची मुदत वाढ मिळण्याची चर्चा होती, मात्र त्यांच्या मुदतवाढीचा प्रस्ताव राज्य सरकारने केंद्र सरकारकडे पाठवला नसल्याची माहिती आहे. त्यामुळे ते आता येत्या ३१ मार्चला निवृत्त होणार आहेत. आता त्यांच्या जागी नवीन आयुक्त कोण होणार? याबाबत उत्सुकता वाढली आहे.

भूषण गगराणी हे १९९० च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. ते २०२४ साली मार्च महिन्यात मुंबईचे आयुक्त झाले. गगरानी यांच्याआधी १९८९ बॅचचे आयएएस अधिकारी इकबाल चहल हे मुंबई महापालिकेचे आयुक्त होते. निवृत्तीनंतर सरकारने त्यांच्यावर मुंबई पोलीस गृहनिर्माण प्रकल्पाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी दिली. तसेच त्यांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा देण्यात आला. गगराणी यांचा कार्यकाळ येत्या ३१ मार्चला संपणार असून ते निवृत्त होणार आहेत.

IAS Bhushan Gagrani : IAS भूषण गगराणी निवृत्त होणार; आता BMC आयुक्तपदी कुणाची नियुक्ती? ७ बड्या अधिकाऱ्यांच्या नावांची चर्चा
Mumbai : बॉयफ्रेंडने मैत्रिणीच्या केसांची स्तुती केली, संतापलेल्या गर्लफ्रेंडने कैची घेतली अन्...; मुंबईतील धक्कादायक प्रकार

भूषण गगराणी यांच्या निवृत्तीनंतर पालिका आयुक्तपदासाठी ७ वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नावांची चर्चा आहे. मुंबई मेट्रोच्या व्यवस्थापकीय संचालिका अश्विनी भिडे, महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे, सामान्य प्रशासन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव व्ही. राधा, गृहनिर्माणचे अतिरिक्त मुख्य सचिव असीम गुप्ता, गृह विभागाच्या अतिरिक्त सचिव मनीषा म्हैसकर-पाटणकर, एमएमआरडीएचे आयुक्त डॉ. संजय मुखर्जी, म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांच्या नावांची चर्चा जोर धरू लागली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com