भाजपला शह! कल्याण-डोंबिवलीत शिंदेसेनेने 'मॅजिक फिगर' गाठलं, मनसे-काँग्रेसच्या साथीने महापौर बसवणार?

Shinde Sena reaches magic figure in KDMC: कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेमध्ये शिवसेना शिंदेगटाचा महापौर होणार आहे. याठिकाणी शिवसेनेने मॅजिक फिगर गाठली. शिंदेसेनेला मनसेनंतर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि ठाकरेंच्या काही नगरसेवकांचा पाठिंबा मिळाला.
भाजपला शह! कल्याण-डोंबिवलीत शिंदेसेनेने 'मॅजिक फिगर' गाठलं, मनसे-काँग्रेसच्या साथीने महापौर बसवणार?
Eknath shindeSaam tv
Published On

Summary -

  • कल्याण-डोंबिवलीत मोठी राजकीय उलथापालथ

  • शिंदेसेनेने मॅजिक फिगर ६२ पार केली

  • मनसे, काँग्रेस, राष्ट्रवादीने शिंदेसेनेला दिला पाठिंबा

  • शिंदेसेनेने भाजप सत्तेपासून दूर ठेवले

कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेमध्ये राजकीय उलथापालथ झाली. या महानगर पालिकेत शिवसेना शिंदेगटाचा महापौर होणार आहे. शिदेंनी भाजपला धक्का देत सत्तेपासून त्यांना दूर ठेवलं. कल्याण-डोंबिवलीमध्ये शिंदेच्या शिवसेना राज ठाकरेंच्या मनसेकडून पाठिंबा मिळाला आहे. तर आता त्यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून देखील पाठिंबा मिळाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे शिंदेच्या शिवसेनेला बहुमताचा आकडा पार करण्यात यश आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण- डोंबिवली महानगर पालिकेमध्ये शिंदेच्या शिवसेनेनी आपली बार्गेनिंग पावर वाढली. याठिकाणी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा आकडा ६५ वर पोहचला आहे. महापौरपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि काँग्रेस शिंदेंच्या शिवसेनेसोबत आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा १ नगरसेवक तर काँग्रेसचे २ नगरसेवक शिंदेंसोबत आले आहेत. तर उबाठाचे ४ नगरसेवक देखील शिंदेंच्या सोबत जाणार आहेत. त्यामुळे कल्याण- डोंबिवली महानगर पालिकेवर युतीचा महापौर बसणार हे निश्चित झाले आहे.

भाजपला शह! कल्याण-डोंबिवलीत शिंदेसेनेने 'मॅजिक फिगर' गाठलं, मनसे-काँग्रेसच्या साथीने महापौर बसवणार?
KDMC Politics: मोठी बातमी! कल्याण-डोंबिवलीत राजकीय उलथापालथ, मनसेच्या पाठिंब्याने शिंदेसेनेचा महापौर होणार?

कल्याण-डोंबिवलीमध्ये महापौर पदासाठी बहुमताचा आकडा ६२ असणं आवश्यक आहे. या निवडणुकीमध्ये शिवसेना शिंदे गटाचे ५३ नगरसेवक विजयी झाले. तर भाजपचे ५० नगरसेवक विजयी झाले. शिवसेना ठाकरे गटाचे ११ नगरसेवक, मनसेचे ५ नगरसेवक, काँग्रेसचे २ नगरसेवक आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचा एक नगरसेवक विजयी झाले. शिवसेना शिंदे गटाला महापौरपदासाठी बहुमताचा आकडा ६२ असणं आवश्यक आहे.

भाजपला शह! कल्याण-डोंबिवलीत शिंदेसेनेने 'मॅजिक फिगर' गाठलं, मनसे-काँग्रेसच्या साथीने महापौर बसवणार?
KDMC Mayor: मोठी बातमी! कल्याण-डोंबिवलीत महापौर शिंदेसेनेचा, मनसेने दिला पाठिंबा

आता शिंदे गटाला मनसेने पाठिंबा दिला. त्यापाठोपाठ काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने पाठिंबा दिल्याची देखील माहिती समोर आली आहे. त्याचसोबत ठाकरेंचे ११ पैकी ४ नगरसेवक हे देखील शिंदेंच्या संपर्कात आहेत. त्यामुळे ते देखील त्यांना पाठिंबा देणार आहेत. हे सर्वजण मिळून शिंदेच्या शिवसेनेकडे ६५ चा आकडा होत आहे. त्यामुळे कल्याण-डोंबिवलीत महापौर शिंदेंच्या शिवसेनेचा होणार आहे.

भाजपला शह! कल्याण-डोंबिवलीत शिंदेसेनेने 'मॅजिक फिगर' गाठलं, मनसे-काँग्रेसच्या साथीने महापौर बसवणार?
KDMC Mayor : ठाकरेंचे २ नगरसेवक मनसेत तर २ गायब, कल्याणचं चक्रावणारे राजकारण

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com