KDMC Mayor: मोठी बातमी! कल्याण-डोंबिवलीत महापौर शिंदेसेनेचा, मनसेने दिला पाठिंबा

KDMC Election: कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेवर शिवसेना शिंदेगटाचा महापौर होणार यावर शिक्कामोर्तब झाला आहे. मनसेने शिवसेना शिंदे गटाला पाठिंबा दिला असल्याची माहिती खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिली.
KDMC Mayor: मोठी बातमी! कल्याण-डोंबिवलीत महापौर शिंदेसेनेचा, मनसेने दिला पाठिंबा
Raj Thackeray and Eknath Shindesaam tv
Published On

Summary:

  • कल्याण-डोंबिवलीत महापौर शिंदेसेनेचाच होणार

  • मनसेनेने शिवसेना शिंदे गटाला दिला पाठिंबा

  • मनसेच्या ५ नगरसेवकांचा शिंदगटाला पाठिंबा

  • खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिली माहिती

कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेमध्ये मोठी राजकीय घडामोड घडली. या महानगर पालिकेमध्ये शिवसेना शिंदेगटाचा महापौर होणार आहे. राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शिवसेना शिंदे गटाला पाठिंबा दिला असल्याची माहिती शिवसेना शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिली. कल्याण-डोंबिवलीमध्ये मनसे-शिवसेना एकत्र आली आहे. मनसेच्या ५ ही नगरसेवकांनी शिवसेना शिंदेगटाला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे आता कल्याण-डोंबिवलीमध्ये शिंदेंचा महापौर होणार यावर शिक्कामोर्तब झाला. ५३ नगरसेवकांसह कोकणभवनामध्ये शिंदेच्या शिवसेनेकडून गट स्थापन करण्यात आला.

खासदार श्रीकांत शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, 'कल्याण- डोंबिवलीत मनसेने शिवसेनाला पाठिंबा दिला. कल्याण- डोंबिवलीमध्ये महायुतीचा महापौर होणार आहे. महापौर किंवा इतर पदांबाबत चर्चा नाही. महापौरपदाबाबत आता वरिष्ठ निर्णय घेतील. आम्ही भाजपला बाजूला ठेवणार नाही. रवींद्र चव्हाण आणि एकनाथ शिंदे एकत्र बसूव चर्चा करतील. ठाकरेंची सेना सोबत आली तरी स्वागतच आहे. '

KDMC Mayor: मोठी बातमी! कल्याण-डोंबिवलीत महापौर शिंदेसेनेचा, मनसेने दिला पाठिंबा
KDMC Politics: मोठी बातमी! कल्याण-डोंबिवलीत राजकीय उलथापालथ, मनसेच्या पाठिंब्याने शिंदेसेनेचा महापौर होणार?

कल्याण-डोंबिवलीमध्ये शिवसेना शिंदे गटाने मनसेसोबत युती केली. कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना शिंदे गटाचे ५३ नगरसेवक विजयी झाले. तर भाजपचे ५० नगरसेवक निवडून आले. शिवसेना ठाकरे गटाचे ११ नगरसेवक आणि मनसेचे ५ नगरसेवक विजयी झाले. शिवसेना शिंदे गटाला महापौरपदासाठी बहुमताचा आकडा ६२ असणं आवश्यक आहे. आता शिंदे गटाला मनसेने पाठिंबा दिला. मनसेचे ५ नगरसेवक आणि शिंदे गटाचे ५३ नगरसेवक मिळून आकडा ५८ वर जात आहे. आता उर्वरीत ४ नगरसेवकांचा पाठिंबा मिळणं गरजेचे आहे.

KDMC Mayor: मोठी बातमी! कल्याण-डोंबिवलीत महापौर शिंदेसेनेचा, मनसेने दिला पाठिंबा
KDMC मध्ये २१ उमेदवार बिनविरोध, सत्ताही आमचीच येणार; मंत्री पंकजा मुंडेंनी सांगितलं गणित

अशातच ठाकरे गटाचे ४ नगरसेवक हे नॉटरिचेबल आहे. मंगळवारी शिवसेना ठाकरे गट कोकण विभगीय आयुक्तांकडे आपल्या गटाची स्थापना करण्यासाठी जात असताना ठाकरेंचे ४ नगरसेवक गैरहजर होते. यामधील २ नगरसेवक आधीपासूनच नॉटरिचेबल आहेत तर उर्वरीत दोन नगरसेवक है बैठकीला आले नाहीत. त्यामुळे हे चार नगरसेवक शिंदेगटाला पाठिंबा देणार की काय? अशी चर्चा कल्याण-डोंबिवलीमध्ये सुरू आहे.

KDMC Mayor: मोठी बातमी! कल्याण-डोंबिवलीत महापौर शिंदेसेनेचा, मनसेने दिला पाठिंबा
KDMC Mayor : ठाकरेंचे २ नगरसेवक मनसेत तर २ गायब, कल्याणचं चक्रावणारे राजकारण

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com