

Mumbai Mayor Decision : मुंबई महापालिकेचा नवा महापौर कोण? याचा निर्णय राजधानी दिल्लीमध्ये होणार आहे. निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदेंकडून पुढील वर्षभरासाठी महापौरपदासाठी मागणी केल्याची चर्चा आहे. मुंबई महापौरदावरून भाजप आणि शिवसेना यांच्यामध्ये रस्सीखेच सुरू आहे. महापौरपदाचा वाद मिटवण्यासाठी भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम, आशिष शेलार आणि शिवसेना नेते राहुल शेलार यांची दिल्लीमध्ये बैठक झाली आहे. तिन्ही नेते लवकरच अमित शाह यांची भेट घेणार आहेत. (Mumbai Mayor decision to be taken in Delhi)
शिवसेना नेते राहुल शेवाळे यांच्या दिल्लीतील निवासस्थानी महापौरपदावर मंगळवारी रात्री महापौरपदावरून खलबतं झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर आहेत, तर दुसरीकडे दिल्लीमध्ये मुंबई महापौरपदावर चर्चा सुरू झाली. राजधानी दिल्लीमध्ये मुंबईच्या महापौरपदावर खलबतं सुरू आहे. शेलार, साटम अन् शेवाळे यांच्यामध्ये चर्चा झाली. तिन्ही नेते आज अमित शाह यांची भेट घेणार आहेत. यामध्ये मुंबईच्या महापौरपदाचा निर्णय होईल, असा अंदाज वर्तवला जातोय.
अमित शाह यांच्यासोबत भेट होण्याआधी महाराष्ट्र सदनात दोन्ही पार्टीच्या नेत्यांची बैठक होणार आहे. राजधानीत होणाऱ्या या बैठकीत मुंबई महापौरपद, तसेच स्थायी समिती अध्यक्ष आणि इतर समित्यांच्या पदांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. दरम्यान पक्षाच्या चिन्हाबाबत बुधवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे, त्या निमित्ताने आशिष शेलार दिल्लीत आलेले आहेत, असे शिवसेना नेत्याने सांगितले. महापौरपद आणि इतर मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी दोन्ही पक्षांचे नेते भेटणार आहेत.
एकनाथ शिंदेंनी मुंबई महापालिकेत एक वर्षभरासाठी महापौरपद मागितल्याचं एका शिवसेना नेत्याने सांगितलेय. बाळासाहेब ठाकरे यांच्या शताब्दी वर्षात शिवसेनेला महापौर व्हावा, ही जनतेची इच्छा असल्याचे शिंदे यांचे म्हणणे आहे. महापालिकेत शिवसेनेचा महापौरपद मिळाल्यास मुंबईकरांना सकारात्मक संदेश जाईल. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या संदर्भात आपला मुद्दा भाजप नेत्यांसमोर मांडला आहे. मुंबईचा महापौर शिवसेनेचा झाल्यास एकनाथ शिंदे यांना उद्धव सेनेवर दबाव आणण्याची संधी मिळेल. महापौरपद किंवा इतर समित्यांमधील पदांबाबत अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यातील बैठकीत घेतला जाईल, असे शिवसेनेच्या नेत्याने सांगितले.
मुंबईच्या महापौरपदावरून भाजप अन् शिंदेसेनेत सुरू असलेल्या रस्सीखेचवरून ठाकरेसेनेचे खासदार संजय राऊतांनी निशाणा साधला. राऊत म्हणाले की, इतिहासात पहिल्यांदाच अमित शाह दिल्लीत मुंबई महापौरपदाचा निर्णय घेत आहेत. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना आणि त्यांच्या समर्थकांना दिल्ली न्यायालयात दाद मागण्यास भाग पाडले जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.