Badlapur News : धक्कादायक! इमारतीचं काम सुरु; वरच्या मजल्यावरून पडलेली सळई तरुणाच्या शरीरातून आरपार

बदलापूरच्या ठाणेकर पॅलेसिओ गृहप्रकल्पातील प्रकार
Badlapur News
Badlapur NewsSaam Tv

Latest Badlapur News : बदलापूर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका निर्माणाधीन इमारतीवरून पडलेली सळई खाली उभ्या असलेल्या एका तरुणाच्या शरीरात घुसून आरपार निघाल्याची घटना घडली आहे. या तरुणावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्याची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती समोर आली आहे. (Latest Marathi News)

Badlapur News
Crime News : पाठीत खुपसलेल्या चाकूसह पाेहाेचला रुग्णालयात; हल्ल्याचा व्हिडिओ व्हायरल

बदलापूर (Badlapur) पूर्वेच्या पनवेलकर हायवे लगत ठाणेकर पॅलेसिओ नावाच्या गृहप्रकल्पाचं बांधकाम सुरू आहे. या प्रकल्पाच्या खाली रिलायन्स मार्ट सुरू होत आहे. आज संध्याकाळी साडेचारच्या सुमारास या रिलायन्स मार्ट दुकानाच्या बाहेर सीसीटीव्ही कॅमेरा (CCTV Camera) फिटिंग करण्यासाठी सत्यप्रकाश तिवारी हा २६ वर्षीय कामगार काम करत होता.

या इमारतीचं बांधकाम सुरू असल्यामुळे आठव्या मजल्यावरून एक सळई अचानक खाली कोसळली. ही सळई सत्यप्रकाश याच्या खांद्यात घुसली आणि पाठीतून आरपार बाहेर पडली. या घटनेमुळे तिथे काम करत असलेल्या कामगारांमध्ये एकच खळबळ उडाली यानंतर सत्यप्रकाश याला तातडीने गांधी चौकातील निर्मल हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आलं. (Badlapur News)

Badlapur News
Panvel Crime News: पनवेल हादरले! गावात कोंबडी चोरायला आले अन् १९ वर्षीय तरुणासोबत घडले भयंकर कृत्य; धक्कादायक घटनेने सर्वत्र खळबळ

तिथे डॉक्टरांनी त्याच्यावर शस्त्रक्रिया करत त्याच्या पाठीत घुसलेली सळई काढली. शस्त्रक्रियेनंतर त्याची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती बदलापूर पूर्व पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पडवळ यांनी दिली आहे.

याप्रकरणी पोलीस ठाण्यात कोणताही गुन्हा अद्याप दाखल करण्यात आलेला नाही. दरम्यान, या घटनेबाबत प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी ठाणेकर पॅलेसियो गृह प्रकल्पाचे विकासक अजय ठाणेकर यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com