Crime News
Crime NewsSaam tv

Panvel Crime News: पनवेल हादरले! गावात कोंबडी चोरायला आले अन् १९ वर्षीय तरुणासोबत घडले भयंकर कृत्य; धक्कादायक घटनेने सर्वत्र खळबळ

Crime News Update: एका कोंबडीसाठी झालेल्या या वादात तरुणाची हत्या झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.
Published on

सिद्धेश म्हात्रे, प्रतिनिधी...

Panvel News: कोंबडी चोरायला आलेल्या चोरांसोबत झालेल्या झटापटीत एका तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पनवेलमधील शिवकर गावात ही आश्चर्यकारक आणि तितकीच संतापजनक घटना घडली आहे. 29 मार्च रोजी हा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे.. (Latest Marathi News)

Crime News
LSG vs DC IPL Match : मार्क वुडच्या भेदक माऱ्यापुढे दिल्लीचे फलंदाज ढेर; लखनौचा ५० धावांनी विजय

जिभेचे चोचले पुरविण्यासाठी मध्यरात्री 3 जण पनवेल मधील शिवकर गावात कोंबडी चोरण्यासाठी गेले मात्र चोरीचा कारनामा करताना घरातील एका तरुणाने या चोरट्यांना पाहिलं आणि त्यांचा चोरीचा कारनामा फसला. त्यांना पाहिल्यानंतर तरुण विनय पाटील याने आपल्या घरातील कुऱ्हाड घेऊन या चोरट्यांचा पाठलाग करायला सुरुवात केली.

गावच्या बाहेर काही अंतरावर तिघा चोरट्यांसोबत त्याची झटापट झाली. या झटापटीत विनयने आणलेल्या कुऱ्हाडीनेच चोरट्यांनी त्याच्यावर हल्ला करत वार केले. या हल्ल्यात दुर्दैवाने विनयचा मृत्यू झाला. याप्रकरणाची तक्रार पनवेल शहर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली होती.

Crime News
Shirdi Ram Navami Yatra : शिर्डीच्या यात्रेत मोठी दुर्घटना! अचानक पाळणा तुटला अन्.., थरकाप उडवणारा VIDEO

या प्रकरणी तपास करत असताना पोलिसांनी तेथीलच एका बेकरीत काम करणाऱ्या तिघांना ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता याच तिघांनी विनयला मारले असल्याचे निष्पन्न झाले. या तिघांनाही पोलिसांनी अटक केली आहे. ( Panvel Crime News)

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com