ना पक्षाचा झेंडा, ना राजकारण! ठाकरे बंधूंचा रविवारचा मोर्चा कसा असेल? कुठून कुठे निघणार? काय मागण्या? A टू Z माहिती

Raj and Uddhav Thackeray joint march July 26 : राज आणि उद्धव ठाकरे यांच्या संयुक्त मोर्चाची संपूर्ण माहिती जाणून घ्या. २६ जुलै रोजी शिवाजी पार्क ते सिद्धिविनायक असा मोर्चा निघणार असून कोणतेही पक्षीय झेंडे नसतील, फक्त तिरंगा असेल. मोर्चाचा मार्ग, वेळ, प्रमुख मागण्या आणि राज ठाकरेंचा इशारा वाचा.
Raj Thackeray Uddhav Thackeray Latest News
Raj Thackeray Uddhav Thackeray Latest NewsSaam TV Marathi
Published On

Raj Thackeray Uddhav Thackeray Latest News : केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यापेक्षा आता हा विषय मोठा झाला असून, विद्यार्थ्यांचा या सरकारवरचा विश्वास पूर्णपणे उडालेला आहे. ज्या विद्यार्थ्यांनी 'अच्छे दिन'च्या अपेक्षेने सरकार आणले, त्यांच्यावरच हे सरकार निर्दयीपणे लाठीमार करत आहे, अशी घणाघाती टीका ठाकरे बंधूंनी केली आहे. विद्यार्थी आणि पालकांच्या संतापाला वाट करून देण्यासाठी येत्या रविवारी (२६ तारीख) शिवाजी पार्क (शिवतीर्थ) ते सिद्धिविनायक मंदिरापर्यंत एका संयुक्त मोर्चाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती ठाकरे बंधूंनी संयुक्त पत्रकार परिषदेत दिली.

विद्यार्थी आणि पालकांच्या रागाला वाट करून देण्यासाठी येत्या रविवारी (२६ तारीख) आम्ही एक शक्तीप्रदर्शन/मोर्चा आयोजित केला आहे. हा मोर्चा शिवाजी पार्क (शिवतीर्थ) येथून निघून सिद्धिविनायक मंदिरापर्यंत जाईल, जिथे आम्ही देवाला या सरकारला सुबुद्धी देण्याचे साकडे घालणार आहोत.रविवारी देशाची ताकद दाखवण्यासाठी मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. सरकारला सुडबुद्धी दे नाहीतर सरकारच्या रूपाने आलेले हे संकट दूर कर, असे सिद्धीविनायकाकडे साकडे घालणार असल्याचे ठाकरेंनी सांगितले.

सरकार आणि पोलिसांच्या कारवाईवर जोरदार प्रहार:

आंदोलकांवर कारवाई करण्यासाठी सिव्हिल ड्रेसमध्ये पोलिसांसोबत लाठ्या घेऊन फिरणारे गुंड आणले जात आहेत. हे आंदोलन मोडून काढण्यासाठी भाजपने गुंड आणले आहेत का, असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला केला. पोलीस गाडीत बसलेल्या विद्यार्थ्यांना 'परत दिसलात तर ५० ग्रॅमची पावडर खिशात टाकून केसेस करू' अशा धमक्या देत आहेत. हे पोलीस आहेत की ड्रग्ज सप्लायर, असा संतप्त सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला.

Raj Thackeray Uddhav Thackeray Latest News
५०० रुपयांच्या नोटांचा बोलबाला, पण २०० ची नोट पडली मागे; RBI च्या अहवालात नेमकं काय काय?

२६ तारखेचे आंदोलन कसं असेल ?

आम्ही येत्या २६ तारखेला (रविवारी) एक मोर्चा/शक्तीप्रदर्शन करायचं ठरवलेलं आहे. हा मोर्चा शिवाजी पार्कवरून (शिवतीर्थ) निघेल आणि सिद्धिविनायकाकडे जाऊन आम्ही देवाला साकडं घालणार आहोत की या सरकारला सुबुद्धी दे, अशी माहिती राज ठाकरेंनी दिली. या आंदोलनाला कुठलंही राजकीय वळण द्यायचं नाहीये. या मोर्च्यामध्ये कोणत्याही राजकीय पक्षाचे झेंडे नसतील, तिथे फक्त आणि फक्त देशाचा तिरंगा असेल. २६ तारखेला आमचा मोर्चा अत्यंत शांततेने होईल. पण जर कोणी दिल्लीसारखे गुंड घुसवण्याचा किंवा दडपशाही करण्याचा प्रयत्न केला, तर लक्षात ठेवा, आमचे लोक फटकावून काढणार कुणालाही सोडणार नाही, असा इशाराच दिला.

Raj Thackeray Uddhav Thackeray Latest News
DA Hike : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! सरकारने महागाई भत्ता वाढवला, ३२ सरकारी कंपन्यांचा पगार इतका वाढणार

ठाकरेंचा इशारा -

२६ तारखेला जर असे कोणी घुसवण्याचे प्रयत्न केले ना, पटकवून काढणार! कळलं का? शांततेने मोर्चा असेल, शांततेने या सगळ्या गोष्टी होतील. याच्यामध्ये कुठचीही हुल्लडबाजी नसेल, काहीच गोष्टी नसतील. पण उद्या जर समजा दिल्लीसारखं इथे काही करायचा प्रयत्न केला, आमची लोकं सोडणार नाहीत, अशा इशारा राज ठाकरेंनी दिला.

मोर्चा कसा आणि कुठून निघणार ?

२६ जुलै रोजी सकाळी १० वाजता जमायची वेळ आहे. ११ वाजता शिवाजी पार्कमधून मोर्चाला सुरूवात होईल. सिद्धीविनायक मंदिरात जाऊन देशावरील संकट दूर करण्यासाठी साकडं घातलं जाणार आहे. रविवारी निघणाऱ्या मोर्चामध्ये सर्व पक्षांनी सोबत यावं. काँग्रेस सहभागी होणार असल्याचे सपकाळ यांनी सांगितलेय. पवार साहेबांसोबत बोलण सुरू आहे. भाजपमधील लोकही यात सहभागी होऊ शकतात, असे ठाकरे म्हणाले.

Raj Thackeray Uddhav Thackeray Latest News
Paper Leak: मोदींची 'फास्ट ट्रॅक कोर्ट'ची घोषणा, राहुल गांधींचा पलटवार; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासह केल्या 'या' ३ मोठ्या मागण्या

मतपेटीचा विषय नाही -

हा विषय मतपेटीचा नाहीये. पहिली गोष्ट तुम्ही लक्षात घ्या, आता हा विषय मतपेटीचा नाहीये, हा विषय कुठच्या निवडणुकांचा नाहीये, हा विषय आहे त्यांच्या न्यायाचा. कळलं का? विद्यार्थी आत्महत्या करतात याचा अर्थ काय, समजून घ्या ना! इथे मतपेटीचा विषय येतो कुठे? पण ज्या प्रकारचा देशामध्ये सत्ता राबवली जाते, त्याच्या विरुद्धचा राग हा मला असं वाटतं प्रत्येक राज्याराज्यांमधनं बाहेर येतोय, ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, असे राज ठाकरे म्हणाले.

राज ठाकरेंचा हल्लाबोल, काय म्हणाले ?

गेले काही दिवस विद्यार्थ्यांचं आंदोलन देशात सुरू आहे आणि ते कशाप्रकारे चिरडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हे आपल्याला समजतंय. खरंतर ते संपूर्ण आंदोलन शांततापूर्ण मार्गाने सुरू झालेलं आंदोलन होतं. आज केंद्रातनं ज्या प्रकारचा दबाव त्या मुलांवरती, मुलींवरती आणला जातोय आणि त्यांना ज्या प्रकारे मारलं जातंय, त्याचे परिणाम संपूर्ण देशभर आणि महाराष्ट्रात उमटत आहेत, असे राज ठाकरे म्हणाले. ज्या वेळेला NEET ची परीक्षा आणली, त्याच वेळी आम्ही विरोध केला होता की असल्या केंद्रीय पद्धतीने तुम्ही परीक्षा घेऊ नका. मी पूर्वीच पंतप्रधानांना सांगितलं होतं की आज शेतकरी आत्महत्या करतायत, उद्या विद्यार्थी आत्महत्या करतील; आणि तेच आज घडत आहे, असेही राज ठाकरे म्हणाले.

Raj Thackeray Uddhav Thackeray Latest News
NEET Paper Leak : पेपरफुटीप्रकरणी केंद्र सरकारचा सर्वात मोठा निर्णय, पीएम मोदींची घोषणा

उद्धव ठाकरे काय म्हणाले ?

हा विषय केवळ शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्या पुरता मर्यादित नाहीये. ज्या विद्यार्थ्यांनी 'अच्छे दिन'च्या अपेक्षेने या सरकारला निवडून आणलं, त्यांच्यावर हे सरकार निर्दयीपणे लाठीमार करतंय. पंतप्रधानांनी ट्वीट करण्यापेक्षा थेट विद्यार्थ्यांशी चर्चा करायला हवी होती, असे उद्धव ठाकरे म्हणाले.. मी आणि राज एकत्र आलो आहे. ज्यांना देशाच्या भविष्याची चिंता आहे. सर्व धर्मिय तिकडे होते. हा देश आपला आहे. तर देशाच्या भविष्याची चिंता आहे. त्यांनी पीएमला भेटून चिंता व्यक्त केला का? आता पंतप्रधानांना विद्यार्थ्यांना भेटण्याची वेळ आली आहे. रविवारी आम्ही मोर्चाचे आयोजन केलेय. त्यात शरद पवार देवेंद्र फडणवीस आले तरी चालतील, असे उद्धव ठाकरे

Raj Thackeray Uddhav Thackeray Latest News
Maharashtra Bandh: आज 'महाराष्ट्र बंद'; काय सुरू अन् काय बंद? जाणून घ्या सविस्तर

झुरळांच्या ताकदीला सरकार घाबरले?

जंतर मंतरवरती एक केंद्रबिंदू झालेला आहे. पण हे आता पूर्ण देशाची भावना आहे. म्हणून मी जे एक म्हटलं ना, की 'एक राष्ट्र एक भावना'. जो जो जिथे जिथे आहे, तिथे तिथे त्यांनी या गोष्टीचा विरोध व्यक्त केला पाहिजे. सगळेजण काय जंतर मंतरवरती पोहोचू शकतात, जाऊ शकतात आणि जाण्याची गरज आहे असं मला वाटत नाही. आज ग्रामीण भागात सुद्धा आंदोलनं होतायत. राज्यातल्या आणि देशातल्या अनेक शहरांमध्ये ही आंदोलनं होतायत. विद्यार्थी झुंडीच्या झुंडीने बाहेर पडतायत. आणि कालच एक मी व्हिज्युअल बघितलं की, एक तरुणी त्या पोलिसांच्या गाडीसमोर एकटी उभी राहिली होती. इथेच... बाजूला. ही तरुणांची ताकद आहे. ज्या ताकदीला झुरळ समजलं जातं, त्या झुरळांच्या ताकदीला आता हे घाबरलेले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com