देशात ५०० रुपयांच्या नोटांचा वापर आणि मागणी झपाट्याने वाढल्याची माहिती आरबीआयच्या अहवालातून समोर आले आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच RBI ताज्या आकडेवारीनुसार सध्या बाजारात चालणाऱ्या एकूण चलनामध्ये ५०० रुपयांच्या नोटांचा वाटा सर्वाधिक म्हणजेच तब्बल ८६ टक्के झाला आहे.
२०० आणि १०० रुपयांच्या नोटांचे बाजारातील प्रमाण मात्र कमी होत चालले आहे. २००० रुपयांची नोट बंद झाल्यानंतर लोकांनी मोठ्या व्यवहारांसाठी आणि खरेदीसाठी ५०० च्या नोटांनाच जास्त पसंती दिली आहे. बँक एटीएममधूनही आता ५०० च्याच नोटा जास्त निघत असल्याने २०० ची नोट बाजारात हळूहळू कमी दिसू लागली आहे.
१०० आणि ५०० रुपयांमधील मागणी पूर्ण करण्यासाठी आरबीआयने २०० रुपयांची नोट चलनात आणली होती. पण आता हीच नोट बाजारात सर्वात कमी दिसते. आरबीआयच्या ताज्या आकडेवारीनुसार, २०० ची नोट आता सर्वात कमकुवत झाली आहे. चलनात असलेल्या एकूण नोटांमध्ये २०० रुपयांचा वाटा फक्त ६.१३ टक्के इतका आहे. तर ५०० रुपयांची नोट बाजाराचा राजा झाली. आरबीआयच्या अहवालानुसार, सध्या देशात १७६.५५ अब्ज नोटा चलनात आहेत. त्यापैकी ५०० रुपयांच्या नोटांचा वाटा ४१.२५ टक्के आहे, लाईव्ह हिंदुस्थानने याबाबतचे वृत्त दिले आहे.
२०० रुपयांची नोट केवळ ६.१३ टक्के वाटा घेऊन मागे पडली आहे. तर दुसरीकडे १०० रुपयांच्या नोटा १६.०३ टक्के वाटा घेऊन मोठ्या संख्येने बाजारात प्रचलित आहेत. १० रुपयांच्या नोटा १५.९४ टक्के वाटा घेऊन प्रचलित आहेत. २०० रूपयांची नोट जितक्या वेगाने आली तितक्याच वेगाने नाहीशी झाली.. ऑल इंडिया बँक ऑफिसर्स कॉन्फेडरेशनचे राज्य उपाध्यक्ष प्रवीण मिश्रा म्हणतात की, बाजारपेठेने २०० रुपयांच्या नोटेला योग्य स्थान दिले नाही. लोकांना लहान-सहान व्यवहारांसाठी १०० रुपयांची नोट अधिक सोयीस्कर वाटते, तर मोठ्या खरेदीसाठी किंवा व्यवहारांसाठी ५०० रुपयांची नोट सर्वाधिक वापरली जाते. याच कारणामुळे २०० रुपयांची नोट या दोन्हींमध्ये स्वतःची ओळख निर्माण करू शकली नाही.
डिजिटल पेमेंटमुळे देखील मर्यादित
आर्थिक तज्ज्ञ अंकुर गोयल म्हणतात की, एटीएममधून प्रामुख्याने १०० आणि ५०० रुपयांच्या नोटा मिळतात. व्यापाऱ्यांच्या मतेही याच नोटांमध्ये मोठ्या प्रमाणात व्यवहार होतात. २०० रुपयांची नोट आता कमी वापरली जात आहे. डिजिटल पेमेंटच्या झपाट्याने वाढणाऱ्या वापरामुळे तिची उपयुक्तताही मर्यादित झाली आहे.
२५ ऑगस्ट २०१७ रोजी २०० रुपयांची नोट सर्वप्रथम जारी करण्यात आली. त्यावेळी १०० आणि ५०० रुपयांच्या नोटांमधील तफावत भरून काढण्यासाठी २०० ची नोट बाजारात आणली होती. एसबीआयचे निवृत्त अधिकारी आर. सी. शुक्ला म्हणतात की, २०० रुपयांची नोट आणली होती, तेव्हा ती लहान आणि मध्यम व्यवहारांसाठी सर्वात उपयुक्त नोट होईल, अशा अंदाज होता. पण काही वर्षांतच तिचे अस्तित्व कमकुवत झाले आहे. एटीएम, बँका आणि बाजारपेठेत २०० रुपयांच्या नोटेची उपलब्धता आणि वापर वाढला नाही, तर भविष्यात तिचा वाटा आणखी कमी होऊ शकतो.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.