Paper Leak: मोदींची 'फास्ट ट्रॅक कोर्ट'ची घोषणा, राहुल गांधींचा पलटवार; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासह केल्या 'या' ३ मोठ्या मागण्या

PM Modi fast track court for paper leak cases : पेपरफुटी प्रकरणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फास्ट ट्रॅक कोर्टाची घोषणा केल्यानंतर राहुल गांधी यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.
PM Modi fast track court for paper leak cases
PM Modi fast track court for paper leak casesSaam
Published On

Rahul Gandhi reaction to PM Modi paper leak announcement : देशभरात गाजत असलेल्या पेपर लीक प्रकरणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'फास्ट ट्रॅक कोर्ट' स्थापन करण्याची घोषणा केल्यानंतर राजकीय वातावरण अधिकच तापले आहे. काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर पंतप्रधान मोदींच्या पोस्टला थेट प्रत्युत्तर देत अत्यंत जोरदार शब्दांत हल्लाबोल केला आहे.

तरुणांच्या भविष्याला सर्वात जास्त नुकसान तुम्हीच पोहोचवले आहे, असा थेट आरोप राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर केला आहे. तुम्हीच शिक्षण व्यवस्थेचा नाश केलाय, असा हल्लाबोल राहुल गांधींनी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी फास्ट ट्रक कोर्टात हे प्रकरण चालवले जाईल, अशी घोषणा केली होती. त्यावर राहुल गांधींनी प्रत्युत्तर दिले आहे.

PM Modi fast track court for paper leak cases
NEET Paper Leak : पेपरफुटीप्रकरणी केंद्र सरकारचा सर्वात मोठा निर्णय, पीएम मोदींची घोषणा

पंतप्रधानांच्या ट्विटला रिप्लाय करताना राहुल गांधी यांनी लिहिले की, तुम्ही आपल्या शिक्षण व्यवस्थेवर पूर्णपणे ताबा मिळवू दिला, तिचा विनाश होऊ दिला आणि एवढेच नाही तर याला प्रोत्साहनही दिले. या परिस्थितीला जबाबदार असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तुम्ही संरक्षण दिले आहे. शिक्षण व्यवस्थेतील गोंधळ आणि आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या कारवाईचा उल्लेख करत राहुल गांधींनी सरकारसमोर तीन स्पष्ट मागण्या ठेवल्या आहे.

  • केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना तातडीने पदावरून हटवा.

  • पंतप्रधानांनी स्वतः विद्यार्थ्यांची जाहीर माफी मागावी.

  • आंदोलक विद्यार्थ्यांवर अत्याचार आणि हिंसाचार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा.

PM Modi fast track court for paper leak cases
Maharashtra Bandh: आज 'महाराष्ट्र बंद'; काय सुरू अन् काय बंद? जाणून घ्या सविस्तर

आरोप-प्रत्यारोपांची राळ

एकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांच्या हितासाठी आणि पेपर लीक प्रकरणातील आरोपींना जलद शिक्षा व्हावी म्हणून फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, दुसरीकडे विरोधी पक्षाने यावरून थेट शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची आणि सरकारकडून माफीची मागणी करत आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यामुळे येत्या दिवसांत हा वाद अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com