Maharashtra Bandh: आज 'महाराष्ट्र बंद'; काय सुरू अन् काय बंद? जाणून घ्या सविस्तर

Maharashtra Bandh Today: आजच्या महाराष्ट्र बंदमुळे कोणत्या सेवा सुरू राहणार, कोणत्या बंद राहू शकतात याबाबतची संपूर्ण माहिती जाणून घ्या
Maharashtra Bandh Today
Maharashtra Bandh TodaySaam TV
Published On

VBA Maharashtra Bandh News : राजधानी दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनावर झालेल्या पोलिसांच्या कारवाईचा विरोध करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी वंचित बहुजन आघाडी (VBA) कडून गुरुवारी 'महाराष्ट्र बंद'ची हाक देण्यात आली आहे. या बंदला काँग्रेस, डावे पक्ष, विविध शैक्षणिक संस्था, कोचिंग सेंटर्स आणि कामगार संघटनांनी पाठिंबा दर्शवला आहे. प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, डाव्या विचारसरणीचे राजकीय पक्ष, शैक्षणिक संस्था आणि कोचिंग सेंटर्सनी या बंदला पाठिंबा दिला आहे.

काय सुरू राहणार?

अत्यावश्यक सेवा (दवाखाने, मेडिकल, दूध पुरवठा इत्यादी) पूर्णपणे सुरू राहतील. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था (बसेस आणि लोकल) सामान्यपणे सुरू ठेवण्याचा प्रयत्न आहे, मात्र निदर्शनांमुळे वाहतुकीवर काही प्रमाणात परिणाम होऊ शकतो. आंदोलने झाल्यास, वाहतुकीत व्यत्यय येऊ शकतो आणि रस्ते अडवले जाऊ शकतात.

काय बंद राहू शकते?

काही भाग आणि बाजारपेठांमध्ये दुकाने ऐच्छिक (स्वेच्छेने) बंद राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, मुंबईतील चैत्यभूमीसह महत्त्वाच्या ठिकाणी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. अनुचित प्रकार टाळण्यासाठी काही कार्यकर्त्यांवर खबरदारी म्हणून कारवाई करण्यात आली आहे.

Maharashtra Bandh Today
Rain Alert : कुठे रेड अलर्ट, तर कुठे ऑरेंज अलर्ट? पुढील ४८ तास राज्यात अति मुसळधार पावासाचा अंदाज, IMD कडून अलर्ट

राहुल गांधींकडे मागणी केली

प्रकाश आंबेडकर म्हणाले, आम्ही एक नवीन पिढी घडवण्याचा प्रयत्न करत आहोत. माझ्या मते, सरकारला जबाबदार धरले पाहिजे. सरकारने विद्यार्थी आंदोलनावर अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही, त्यामुळे २३ जुलै रोजी महाराष्ट्रात बंद पाळला जाईल. तसेच, राहुल गांधींनी जंतर मंतरवर जाऊन आंदोलन करावे, असेही मला वाटते. त्यांनी असेही सांगितले की, हे विद्यार्थी आंदोलन त्यांचे नसले तरी, ते त्याला पूर्णपणे पाठिंबा देतात. त्यांनी भाजपच्या विद्यार्थी संघटनेलाही संपात सहभागी होण्याचे आवाहन केले.

Maharashtra Bandh Today
Ladki Bahin Yojana : जूनचा हप्ता १५ जुलैला आला, मग जुलैचे १५०० कधी? ‘लाडकी बहीण’ योजनेबाबत मोठी अपडेट

राखीव पोलीस दलाला पाचारण करण्यास आक्षेप

प्रकाश आंबेडकर म्हणाले, दिल्लीतील विद्यार्थ्यांची आंदोलने दडपण्यासाठी काश्मीरमधून राखीव पोलीस दलांना पाचारण करण्यात आले आहे, ज्याला आमचा तीव्र विरोध आहे. सरकारने विद्यार्थ्यांवर अश्रुधूर किंवा बळाचा वापर करू नये, आम्ही भाजप वगळता सर्व पक्षांना संपात सामील होण्याचे आवाहन केले आहे, जेणेकरून आम्ही आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना आमचा एकजुटीचा पाठिंबा दिसेल.

Maharashtra Bandh Today
मोठी बातमी! कर्जमाफीची पहिली यादी जाहीर, ७ जिल्ह्यातील शेतकऱ्यांची नावं पोर्टलवर, या दिवशी खात्यात येणार पैसे?

वंचित, ठाकरे गट व काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक

दिल्ली येथे सुरू असलेल्या जंतर मंतर वरील आंदोलनात दरम्यान आंदोलन विद्यार्थी आणि विद्यार्थिनींवर पोलिसांनी केलेल्या लाठीमार व अत्याचाराच्या विरोधात बुलढाण्यातील जळगाव जामोद येथे शिवसेना ठाकरे गटाचे काँग्रेसचे वंचित चे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत कार्यकर्त्यांनी अत्याचाराच्या विरोधात रस्ता रोको केला असून गेल्या एक तासांपासून नांदुरा बुऱ्हानपूर मार्गावर कार्यकर्ते तळ ठोकून आहेत सरकार विरोधी ही घोषणाबाजी तसेच धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागणीच्या प्रचंड घोषणाबाजीने परिसर दणाणून उठला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com