Ladki Bahin Yojana : जूनचा हप्ता १५ जुलैला आला, मग जुलैचे १५०० कधी? ‘लाडकी बहीण’ योजनेबाबत मोठी अपडेट

Ladki Bahin Yojana july Installment Update : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा हप्ता १५ जुलैला जमा झाला. आता जुलैचा १५०० रुपयांचा हप्ता कधी मिळणार याबाबतची ताजी माहिती जाणून घ्या.
Maharashtra Ladki Bahin Yojana
Maharashtra Ladki Bahin YojanaSaam TV Marathi
Published On

Ladki Bahin Yojana July installment date : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत जून महिन्याचा हप्ता १५ जुलै रोजी पात्र महिलांच्या खात्यात जमा झाला होता. आता जुलै महिना संपण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असतानाच, जुलै महिन्याचा १५०० रुपयांचा हप्ता कधी मिळणार, याकडे राज्यातील लाडक्या बहिणींचे डोळे लागले आहेत. महिना अखेर आली तरीही शासनाकडून याबाबत कोणतीही अधिकृत अपडेट आलेली नाही. (When will Ladki Bahin July payment be credite)

राज्य सरकारने जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफीमुळे लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्ता लांबणीवर पडणार का? असा मोठा प्रश्न महिलांच्या मनात निर्माण झाला आहे. शेतकरी कर्जमाफीच्या आर्थिक बोजामुळे या योजनेचे पैसे वेळेवर मिळतील की नाही, याबाबत लाभार्थ्यांमध्ये धाकधूक वाढली आहे.

Maharashtra Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana: खात्यात ₹१५०० की ३०००? लाडक्या बहिणींनो, वाचा नेमकी किती महिन्यांची रक्कम जमा झाली

९२ लाख महिलांचा हप्ता ठरला ठप्प

अनेक महिलांना पात्र असूनही या योजनेचा लाभ मिळालेला नाही. मिळालेल्या माहितीनुसार, ई-केवायसी (e-KYC) प्रक्रियेनंतर जवळपास ९२ लाख महिलांचा हप्ता बंद झाला आहे. सध्या केवळ १ कोटी ६९ लाख महिलांच्या खात्यातच १५०० रुपयांचा हप्ता जमा झाला आहे. तांत्रिक अडचणी आणि ई-केवायसी न झाल्यामुळे बँक खात्यात पैसे आले नसल्याने अनेक महिला प्रशासनाकडे फेऱ्या मारत आहेत.

Maharashtra Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींना जूनचे ₹१५०० कधी येणार? सर्वात मोठी अपडेट आली समोर, आज महिलांना मिळणार खुशखबर

नवीन अर्ज प्रक्रियेबाबत तरुणींची प्रतीक्षा

योजना सुरु झाली तेव्हा ज्या मुलींचे वय १९-२० वर्षे होते, त्या आता २१ वर्षे पूर्ण होऊन योजनेच्या अटींनुसार पात्र ठरल्या आहेत. मात्र, गेल्या काही काळापासून योजनेची अधिकृत अर्ज प्रक्रिया बंद असल्याने या तरुण महिलांना योजनेचा लाभ घेता येत नाहीये. ही अर्ज प्रक्रिया पुन्हा कधी सुरू होणार? असा सवाल आता नवीन पात्र महिला विचारत आहेत. एकूणच, जुलै महिन्याचा हप्ता खात्यात कधी जमा होतो आणि नवीन अर्ज कधी सुरू होतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com