Ladki Bahin Yojana: खात्यात ₹१५०० की ३०००? लाडक्या बहिणींनो, वाचा नेमकी किती महिन्यांची रक्कम जमा झाली

Ladki Bahin Yojana June installment update : लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा हप्ता खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. काही महिलांना ₹१,५०० तर काहींना ₹३,००० मिळाल्याची चर्चा आहे.
Ladki Bahin Yojana:
Ladki Bahin Yojana Saam Tv
Published On

Ladki Bahin Yojana Payment Status : राज्यभरातील कोट्यवधी पात्र महिलांसाठी 'लाडकी बहीण योजने'चा जून महिन्याचा हप्ता डीबीटीद्वारे (DBT) बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. १५ तारखेपासून पात्र महिलांना १५०० रुपये मिळत असतानाच, काही महिलांना दोन महिन्यांचा एकत्र लाभ मिळाल्याचे बोलले जात आहे. दुसरीकडे, e-KYC आणि इतर तांत्रिक कारणांमुळे लाभ बंद झालेल्या महिलांसाठी सरकारने एक मोठा निर्णय घेतला असून, या रखडलेल्या हप्त्यांबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.

१५०० की ३०००? खात्यावर नक्की किती पैसे आले?

पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यावर जून महिन्याचा १५०० रुपयांचा हप्ता १५ तारखेपासून जमा होण्यास सुरुवात झाली आहे. हा हप्ता टप्प्याटप्प्याने सर्वांच्या खात्यावर पाठवला जात आहे. काही महिलांच्या खात्यावर ३००० रुपये जमा झाल्याची चर्चा आहे. जर कोणाला ३००० रुपये मिळाले असतील, तर तो मे आणि जून अशा सलग दोन महिन्यांचा हप्ता असू शकतो. (मात्र, याबाबत अद्याप सरकारकडून कोणताही अधिकृत दावा करण्यात आलेला नाही.)

Ladki Bahin Yojana:
Ladki Bahin Yojana : जून महिन्याचा हप्ता या तारखेला होणार जमा; पण 'या'महिलांचे ₹१५०० बंद, मोठी अपडेट आली समोर

e-KYC मुळे लाभ बंद झालेल्यांसाठी मोठी बातमी

निकषात बसूनही केवळ e-KYC पडताळणीअभावी किंवा तांत्रिक चुकीमुळे ज्या महिलांचा लाभ अचानक बंद झाला होता, त्यांच्यासाठी दिलासादायक बातमी आहे. महिलांच्या तक्रारींची दखल घेऊन सरकारने अशा अर्जांची पुन्हा पडताळणी (Re-verification) सुरू केली आहे. पडताळणी यशस्वी झाल्यानंतर या सर्व महिलांना १५०० रुपयांचा लाभ पुन्हा सुरू केला जाईल, अशी माहिती सरकारने दिली आहे.

Ladki Bahin Yojana:
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींच्या खात्यावर पुढच्या आठवड्यात ₹१५०० येणार, महत्त्वाची अपडेट आली समोर

रखडलेले हप्ते मिळणार का?

अनेक महिलांच्या खात्यावर डिसेंबरनंतर एकही हप्ता जमा झालेला नाही. त्यामुळे "फक्त जूनचा हप्ता मिळणार की जुने सगळे रखडलेले हप्ते मिळणार?" असा मोठा प्रश्न उपस्थित होत आहे. तांत्रिक अडचणींमुळे पात्र असूनही ज्यांचे हप्ते रखडले आहेत, त्यांना पडताळणी पूर्ण झाल्यावर त्यांचे थकीत पैसे मिळण्याची शक्यता आहे. मात्र, याबाबत प्रशासनाकडून स्पष्ट आणि अंतिम निर्णयाची प्रतीक्षा आहे.

तुमच्या खात्यावर जून महिन्याचा हप्ता जमा झाला आहे का? की तुमचाही अर्ज पडताळणीत अडकला आहे? अकाउंट लगेच तपासावे.. जून महिन्यांचा हप्ता खात्यावर जमा होण्यास सुरूवात झाली आहे.

Ladki Bahin Yojana:
Ladki Bahin Yojana : ₹१५०० की ₹३०००, लाडक्या बहि‍णींच्या खात्यात किती महिन्याचे पैसे जमा, वाचा महत्त्वाची अपडेट

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com