संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी डोंबिवलीत पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी संघटनात्मक बांधणीसह आगामी निवडणुकांच्या तयारीबाबत महत्वाच्या सूचना दिल्या. जात आणि धर्माच्या वादात अडकण्यापेक्षा सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांकडे लक्ष द्या आणि थेट मतदारांपर्यंत पोहोचा, असा कानमंत्र राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिला.
छटपूजेच्या निमित्ताने सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओचा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न होत असल्याचा दावा त्यांनी केला. महाराष्ट्रात आम्हीच तुमचे कैवारी आहोत, असे दाखवण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून केला जातब असल्याचे मत व्यक्त केले. छटपूजेच्या माध्यमातून धार्मिक कार्यक्रमांसोबतच मतदारसंघ निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे ते म्हणाले.
सोशल मीडियावरील प्रत्येक रील किंवा व्हिडिओ खरा समजू नका, असा इशाराही राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिला. मराठी भाषेच्या वादातून भावना भडकवणारे व्हिडिओ जाणीवपूर्वक पसरवले जात आहेत का, याची पडताळणी करा. कोणत्याही व्हिडिओवर प्रतिक्रिया देण्यापूर्वी त्याची सत्यता तपासा, अशा सूचना त्यांनी केल्या.
दरम्यान, आगामी निवडणुकांच्या दृष्टीने मतदार याद्यांवर विशेष लक्ष केंद्रित करण्याचे आदेश राज ठाकरे यांनी दिले. मतदार यादीतील नावे संबंधित भागात वास्तव्यास असलेल्या नागरिकांचीच आहेत का, याची पडताळणी करा. मतदानाच्या दिवशी कोणताही गोंधळ होऊ नये, यासाठी आतापासूनच नियोजन करण्याचे त्यांनी सांगितले. ठाण्यात मतदानाच्या शेवटच्या तासात तब्बल 80 हजार मतांची वाढ झाल्याच्या उदाहरणाचाही त्यांनी उल्लेख केला. त्यामुळे मतदार यादी आणि SIR प्रक्रियेवर बारकाईने लक्ष ठेवण्याचे निर्देश त्यांनी दिले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.