मुंबईतील लोकल गर्दी कमी होणार, रेल्वेने घेतला गेमचेंजर निर्णय; महत्वाची माहिती आली समोर

mumbai local service : मुंबईतील लोकल गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेने महत्वाचा निर्णय घेतला आहे. याविषयी केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी महत्वाची माहिती दिली आहे.
Mumbai local train
mumbai ac local Saam tv
Published On
Summary

लोकलमधील गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेचे मोठे पाऊल

मुंबईला ५ एसी आणि १ नॉन-एसी नवीन ट्रेन आणखी मिळणार

मुंबईत एसी लोकल फेऱ्यांमध्ये वाढ होणार

मुंबईतील लोकल गर्दीने अनेक प्रवासी त्रस्त झाले आहेत. लोकलमधील गर्दीमुळे अनेक प्रवाशांचा मृत्यू झाले आहेत. लोकल गर्दीची समस्या सोडवण्यासाठी रेल्वेने मागील वर्षांपासून अनेक महत्वाचे प्रकल्प हाती घेतले आहेत. अनेक कामे पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत. रेल्वेने हाती घेतलेल्या प्रकल्पामुळे नागरिकांचा प्रवास सुकर होणार आहे. या प्रकल्पाविषयी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी महत्वाची माहिती दिली.

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं की, प्रवाशांना मुंबईतील लोकल सेवेचा चांगला अनुभव मिळावा, यासाठी महत्वाची पावले उचलण्यात आली आहेत. मुंबईतील लोकल गर्दी कमी करण्यासाठी ५ नवीन एसी आणि १ नॉन एसी ट्रेन सेवेत दाखल होणार आहे. यातील ४ एसी EMU ट्रेन पैकी २ पश्चिम रेल्वेच्या सेवेत आधीच दाखल झाल्या आहेत. आता आठवड्यात एसी लोकल फेऱ्या १०९ हून १३३ वर पोहोचल्या आहेत. वीकेंडला लोकल फेऱ्या ७७ हून १०७ वर पोहोचल्या आहेत. तर १५ डब्याच्या लोकल ट्रेनच्या २११ फेऱ्यांची संख्या ही २२७ पर्यंत वाढण्यात आली आहे'.

Mumbai local train
मुंबई लोकलमध्ये चाललंय काय? दगडफेकीनंतर दिव्यांगाला टोळीकडून मारहाण, ट्रेनमधून फेकून देण्याचाही प्रयत्न

केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत पुढे सांगितले की, मुंबईत दररोज 3234 लोकल फेऱ्या (त्यापैकी 227 एसी लोकल) चालवल्या जातात. तसेच इंटिग्रल कोच फॅक्टरीकडून ऑटोमॅटिक दरवाजे असलेल्या 2 नॉन-एसी EMU तयार करण्यात आल्यात. मुंबई उपनगरात रेल्वेचे जाळे वाढवण्यासाठी १२ डब्यांच्या २३८ नव्या ट्रेन खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे'.

Mumbai local train
Rohit Shetty house Firing: रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपीचा एन्काउंटर; बिश्नोई गँगशी कनेक्शन उघड

तत्पूर्वी, रेल्वेकडून बेंगळुरूमध्येही १४८ किलोमीटर लांबीचा उपनगरी रेल्वे प्रकल्पाचेही काम सुरू आहे . या प्रकल्पासाठी १५,७६७ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या प्रकल्पावर आतापर्यंत एकूण २६५९ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. आता जमीन संपादित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आतापर्यंत ५७ एकर जमिनीपैकी ७.८ एकर जमीन संपादित करण्यात आली आहे. आता उर्वरित जमीन संपादन करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने प्रक्रियेला सुरुवात केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com