Rohit Shetty house Firing: रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपीचा एन्काउंटर; बिश्नोई गँगशी कनेक्शन उघड

Rohit Shetty house Firing case: श्री गंगानगर येथे झालेल्या चकमकीनंतर अटक करण्यात आलेला आरोपी आकाश हा लॉरेन्स बिश्नोई टोळीचा सदस्य असल्याचे निष्पन्न झाले आहे. रोहित शेट्टीच्या निवासस्थानी गोळीबार करण्याची सुपारी घेतल्याचा आरोप त्याच्यावर आहे.
Rohit Shetty House Firing Case
Rohit Shetty House Firing CaseSaam Tv
Published On

Rohit Shetty house Firing case: राजस्थानातील श्री गंगानगर येथे शुक्रवारी संध्याकाळी पोलिस आणि एका संशयित गुन्हेगारामध्ये थरारक चकमक झाली. साधुवाली चेक पोस्टवर नियमित नाकाबंदी सुरू असताना ही घटना घडली. रात्री सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास, जवाहरनगर पोलीस ठाण्याच्या पथकाने नंबर प्लेट नसलेल्या दुचाकीवरून जाणाऱ्या एका तरुणाला थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने पोलिसांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करत बॅरिकेड्स तोडून पळ काढला.

पोलिसांनी तात्काळ त्याचा पाठलाग सुरू केला. या दरम्यान आरोपीने पोलिसांवर गोळीबार केला. प्रत्युत्तर म्हणून पोलिसांनीही गोळीबार केला. ज्यात आरोपीच्या पायाला गोळी लागून तो जखमी झाला. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

Rohit Shetty House Firing Case
Famous Director Death: मनोरंजन विश्वातील तारा निखळला; प्रसिद्ध दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड

जखमी आरोपीची ओळख आकाश (वय ३२, रा. आग्रा, उत्तर प्रदेश) अशी असून, तो कुख्यात लॉरेन्स बिश्नोई टोळीचा सदस्य असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तसेच तो गुंड आरजू बिश्नोईच्या सूचनांनुसार काम करत असल्याचेही उघड झाले आहे. आरोपी सोशल मीडियाच्या माध्यमातून या टोळीच्या संपर्कात आला होता आणि विविध राज्यांमध्ये होणाऱ्या गुन्ह्यात सहभागी होता .

Rohit Shetty House Firing Case
Famous Singer Death: प्रसिद्ध गायकाचा अपघातात दुर्दैवी मृत्यू; कुटुंब बुडाले शोकसागरात

पोलीस महानिरीक्षक (IG) ओम प्रकाश यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, प्राथमिक तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. आकाशने त्याचा साथीदार शिवा गुर्जरच्या मदतीने मुंबईतील प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या घराबाहेर गोळीबार करण्याची सुपारी घेतली होती. ही सुपारी आरजू बिश्नोईने दिली असून तो सध्या परदेशात असल्याचे सांगितले जाते.

पोलीस अधीक्षक हरिशंकर यांच्या मते, आकाश हा एक शूटर असून, तो रेकी करूनच गुन्ह्यांची अंमलबजावणी करतो. राजस्थान, उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्ये त्याच्याविरोधात अनेक गुन्हे दाखल आहेत. पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती की, आकाश श्री गंगानगरमध्ये एका स्थानिक गुंड आणि व्यावसायिकाला टार्गेट करण्यासाठी आला आहे. त्यानुसार साधुवाली चेक पोस्टवर नाकाबंदी करण्यात आली होती आणि त्यावेळी ही चकमक घडली. घटनेनंतर पोलिसांनी आरोपीकडून एक पिस्तूल जप्त केले असून, सध्या त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com